________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४८५
(अ) क्रियापदापूर्वी 'न' ठेवून वाक्य नकारार्थी केले जाते.
(१) तुमं अन्नस्स दिजंति न सहिस्सइ। (नल. पृ.३१) तुला दुसऱ्याला दिलेले तो सहन करणार नाही. (२) तस्स वत्तावि न कया। (नल. पृ१९) त्याची वार्तासुद्धा विचारली (केली) नाही.
(आ) जोर देण्यास ‘न' प्रथम ठेवतात.
निच्छइ णं विजए खत्तिए मम नामं गिण्हित्तए। (विवाग. पृ.९) विजय क्षत्रिय माझे नाव घेण्याचीहि इच्छा करीत नाही.
(ख) करणात्मक वा अकरणात्मक वाक्य दुसऱ्या अकरणात्मक वाक्याशी जोडतांना, उभयान्वयी अव्यय 'न' नंतर येते.
(१) न माणुसीए एरिसं रूवं। न वा एरिसी सत्ती। (नल. पृ.१८) मानवी स्त्रीचे रूप असे असत नाही अथवा शक्तीहि अशी असत नाही. (२) आसि य
अहं एत्तियं कालं रइविरहिओ न उण संपर्य। (समरा. पृ.६४) इतका काळ मी रतिविना होतो, पण आता मात्र नाही.
(२७) (क) क्रियापद वाक्यान्ती असते.
(१) वच्छे धीरा होहि। (बंभ पृ.६१) मुली, धीर धरः (२) तं च पज्जोयस्स वि दिज्जइ। (पाक मा. पृ.४४) व ते पज्जोयालाहि दिले जाते.
(अ) जोर देण्यास क्रियापद वाक्यारंभी ठेवतात.
(१) जाणामि अहं एयं। (पाकमा. पृ.२४) ओळखतो मी याला. (२) वेवइ मे हिययं। (वल. पृ.४) माझो हृदय कापते आहे. __ (आ) कधी क्रियापद मध्ये आढळते.
अहं साहेमि राइणो इमं वइयरं। (पाकमा. पृ.२२) राजाला मी ही हकीकत सांगीन.
(ख) आज्ञार्थी क्रियापद कधी वाक्यारंभी तर कधी वाक्यान्ती असते. वाक्यारंभी :- (१) वच्च तुमं सट्ठाणे। (नल. पृ.१७) तुं स्वस्थानी जा.
(२) पालेह पुव्वपडिवन्नं सावयव्वयं। (नल. पृ.१९) पूर्वी स्वीकारलेले श्रावकव्रत पाळा.
वाक्यान्ती :- (१) एयं मउउरयणं मम पेसेहि। (चउ. पृ.२५) हे मुकुटरत्न! माझ्याकडे पाठव. (२) मम करं देह। (चउ. पृ.१९) मला कर द्या.