________________
४८४
अर्धमागधी व्याकरण
(१९) केवल प्रयोगी व संबोधनार्थी अव्यये वाक्यारंभी असतात.
(१) अहो दारुणया संसारस्स। (समरा. पृ.७५८) काय ही संसाराची दारुणता। (२) भो महाराय! सागयते। (समरा. पृ.१५) अहो महाराज, तुमचे स्वागत असो।
(२०) 'ज्याच्या सह' तन्निदर्शक शब्दानंतर सहार्थी अव्यये असतात.
(१) रन्ना सह। (कथा. पृ.१६०) राजासह (२) तीए सह। (कथा पृ.१६०) तिच्यासह (अ) कधी त्या शग्दापूर्वी सहार्थी अव्यय ठेवतात.
(१) सह तेहिं तिहिं सीसेहिं। (कथा. पृ.१४१) त्या तीन शिष्यासह. (२१) औपम्यदर्शक इव हे उपमानानंतर असते.
(१) सीहो इव। मेरु व्व। (कथा. पृ.१५१) सिंहाप्रमाणे मेरू प्रमाणे (२) नरगवास पिव। (कथा. पृ.१७६) नरक वासा प्रमाणे.
(२२) जोर दर्शक अव्यये ज्यावर जोर द्यायचा त्या शब्दानंतर येतात.
(१) नलो चेव भविस्सइ। (नल. पृ.१२) नलच होईल (२) जाणह च्चिय तुब्भे। (कथा पृ.२०) तुम्ही जाणताच. (३) सहस च्चिय आगओ। (बंभ. पृ.५१) अचानकच आला.
(२३) ज्या नामाला वा सर्वनामाला शब्दयोगी अव्यय जोडून येते, त्या नाम वा सर्वनामानंतर शब्दयोगी अव्यय येते.
कीइसो तेण विणा आणंदो। (समरा. पृ.५२८) त्याच्या विना कसला आनंद?
(२४) जहा-तहा, जाव-ताव, जओ-तओ, इत्यादि अव्ययें आपापल्या वाक्यारंभी येतात.
मा मा एवं जंपसु जओ वेरपरंपरा न कोसल्लं आवहइ। (महा. पृ.१६८अ) असे म्हणू नकोस; कारण वैरपरंपरा कौशल्य आणू शकत नाही.
(२५) 'मा' हे निषेध दर्शक अव्यय वाक्यारंभी येते. मा मा एवं भणह। (कथा. पृ.११२) (कथा. पृ.११२) असे म्हणून नका.
(२६) (क) ज्याचे अकरणरूप करावयाचे तत्पूर्वी 'न' हे अव्यय येते.
(१) न कहिंचि हिंडियव्वं। (बंभ. पृ.५६) कोठेहि हिंडू नये. (२) देहमित्तेण न चित्तेण। (नल. पृ.१५) फक्त देहाने, मनाने नाही.