________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४८३
(इ) कधी विधेयापूर्वी लगेच तुमन्त असते.
तं सुणिय सोयनिब्भराओ रोविउं पयत्ताओ। (बंभ. पृ.७१) ते ऐकून शोकनिर्भर अशा त्या रडू लागल्या.
(१५) स्थलकालदर्शक क्रियाविशेषणे वा वाक्यांश हे वाक्यारंभी असतात.
(१) तत्थ विक्कमजसो नाम राया। (पाकमा. पृ.६३) तेथे विक्कमजस नावाचा राजा होता. (२) अज्जवि तं लोए विक्खायं। (पाकमा. पृ.२८) अजूनहि ते जगात विख्यात आहे. (३) अन्नया तीए नयरीए उच्छवो जाओ। (कथा. पृ.९४) एकदा त्या नगरीत उत्सव झाला.
(अ) उभयान्वयी अव्ययाचा उपयोग असल्यास, ही अव्यये त्या उभायान्वयी अव्ययानंतर ठेवतात.
निवन्नाय तत्थ कुसुमावली। (समरा. पृ.६७) आणि कुसुमावली तेथे बसली. (१६) प्रश्नार्थक अव्ययें वाक्यारंभी असतात
कत्थ संपयं सो महावसभो। (धर्मो. पृ.१२०) आता तो मोठा बैल कुठे आहे?
(१७) स्थल-काल-रीति-दर्शक क्रियाविशेषणे विधेयापूर्वी असतात.
(१) अहं तत्थेव चिट्ठामि। (समरा. पृ.३८) मी तेथेच रहात होतो. (२) ता लहुं आगंतव्वं। (समरा. पृ.६५) तेव्हा लौकर यावे. (३) दयापरवसमणाए मए एवं कयं। (नल. पृ.२३) दयापर मन झाल्याने मी असे केले.
(अ) जोर असल्यास ही अव्यये विधेयापूर्वी ठेवतात.
(१) दढं दहइ मं संतावाणलो। (समरा. पृ.२३) संतापरूपी अग्नि मला फार जाळत आहे. (२) सिग्धं निव्विसओ गच्छसु। (कथा. पृ.१११) ताबडतोब देश सोडून जा.
(१८) च,वा,तु,हि,चे (चेत्) ही अव्यये वाक्यारंभी येऊ शकत नाहीत; पण अह, एवं, अवि, अहवा, अविय, किंच ही अव्यये वाक्यारंभी येऊ शकतात.
(१) एवं च तत्थ सायंदिणं अभिरममाणस्स सरंति वासरा। (महा. पृ.३० ब) आणि अशा प्रकारे तेथे सकाळ संध्याकाळ रमणाऱ्या त्याचे दिवस जाऊ लागले. (२) एत्थंतरंमि य गलिओ कम्म संघाओ। (समरा. ९७) आणि दरम्यान कर्मसमूह नष्ट झाला.