________________
४८२
अर्धमागधी व्याकरण
विषय संगांतून विरक्त झालो आहे. (३) भगवया भणिंय - देवाणुप्पिया एगपत्ती। (धर्मो. पृ.१४४) भगवंताने म्हटले 'देवानुप्रिया, (ती) पतिवता आहे.'
(१२) विधेय धातु साधित विशेषणे प्राय: आपापल्या वाक्यान्ती असतात.
नंदे धम्म सोच्चा समणोवासए जाए। (नायास. पृ.१४१) धर्म ऐकून नंद श्रमणोपासक झाला.
(अ) जोर देण्यास धातुसाधित विशेषण वाक्यारंभी ठेवतात. (१) चिंतियं च चेणं (समरा. पृ.२६) त्याने विचार केला.
(२) परिकुविओ वु एसो तावसो। (समरा. पृ.३१) हा तापस खरचं फार रागावला आहे.
(आ) कधी मध्येही आढळतात. राया गओ तमुज्जाणं (समरा.पृ.३६) राजा त्या उद्यानात गेला. (१३) ल्यबन्त प्राय: वाक्याशांती असते.
ताण संलावं सोऊण संपत्ता तत्थ कोवि तावसा (नल. पृ.१७) त्यांचा संवाद ऐकून काही तापस तेथे गेले.
(अ) जोर देण्यास ल्यबन्त आपल्या वाक्यांशारंभी ठेवतात. पणमिऊण कुलवइं पयट्टो नयरिं। (समरा. पृ.३४) कुलपतीला प्रणाम करून नगरीकडे निघाला.
(१४) तुमन्त प्राय: आपल्या वाक्यांशान्ती असते.
एत्यंतरे भूलधाराहिं वरिसिउं पयट्टो मेहो। (नल. पृ.१८) तेवढ्यात मेघ स्थूल धारांनी वर्षाव करू लागला.
(अ) तुमन्त कधी वाक्यान्ती ठेवतात.
(१) तं सेयं खलु अम्हं चेउगस्स रन्नो जत्तं गिण्हित्तए। (निरया. पृ.२५) तेव्हा चेडग राजावर स्वारी करणे हे आपणास श्रेयस्कर आहे. (२) असमत्थाय अम्हे... भवओ मरणं निवारेउ। (समरा. पृ.५५) आणि तुझे मरण निवारण्यास आम्ही असमर्थ आहोत.
(आ) जोर देण्यास तुमन्त कधी विधेयापूर्वी ठेवतात. ___ काउमारद्धं नियाणं संभूएणं। (बंभ. पृ.३५) संभूयाने निदान करण्यास आरंभ केला.