________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४८१
आम्ही एक्कपए चेन पेच्छंताण चेव अम्ह दड्डा। (पाकमा पृ.२२) की आम्ही पहात असतांनाच कुमार एकदम दग्ध झाले.
(१०) (क) स्थलकालदर्शक सप्तम्यन्त पद वाक्यारंभी येते.
(१) चरिमजामंमि य विउद्धा लच्छी। (समरा. पृ.४२६) शेवटच्या प्रहरी लक्ष्मी जागी झाली. (२) अवंती जणवए उज्जेणी नाम नयरी। (कथा. पृ.११७) अवंती देशांत उज्जेणी नांवाची नगरी होती.
(ख) सत्सप्तमी प्राय : उद्देश्यापूर्वी असते.
अरण्णपरिसरे गच्छंतेसु नावसकुमारेसु सो वि कोऊहलेण... गओ रण्णं। (बंभ. पृ.४८) अरण्य परिसरात तापसकुमार जात असता कुतूहलाने तोहि अरण्यात गेला.
(अ) कधी सत्सप्तमी उद्देश्यानंतर ठेवतात
(१) अहं पि पत्थिओ दक्खिणामुहो तासु गयासु। (वसु. पृ.२६५) त्या गेल्यावर मी दक्षिणेकडे निघालो. (२) न एसा जुगबाहुँमि जीवमाणे अन्नं पुरिसमिच्छेइ। (चउ. पृ.२७) जुगबाहु जिवंत असतां ही अन्य पुरुषाची इच्छा करीत नाही.
(११) संबोधनाची रूपे प्राय: वाक्यारंभी येतात.
(१) पुत्ति मा रुयसु। (नल. पृ.२५) मुली! रडू नकोस (२) सामिणि किंवा एत्थ असंबध्द। (समरा. पृ.७०) आणि स्वामिनी, येथे काय असंबद्ध आहे.
(अ) संबोधनाची रूपे कधी मध्येहि ठेवतात. तए णं अहं गोयमा --- (भग. पृ.८) गोयमा, त्यानंतर मी.
(आ) 'देवाणुप्पिया' व 'भंते' ही संबोधनाची रूपे कधी वाक्यारंभी तर कधी मध्ये आढळतात. ___ मध्ये :- (१) से णं भंते पुरिसे पुव्वभवे के आसी। (विवाग पृ.६) महाराज, पूर्वजन्मी तो पुरुष कोण होता? (२) अहं णं देवाणुप्पिए तव पुत्तं पासिउं हव्वमागए। (विवाग. पृ.४) देवानुप्रिये, तुझ्या पुत्राला पहाण्यास मी येथे आलो आहे.
वाक्यारंभी :- (१) भंते को देवो तुम्ह। (कथा पृ.३८) महाराज! तुमचा देव कोणता? (२) भंते विरत्तो हं विसयाणु संगाओ। (कथा पृ.४९) महाराज, मी