________________
४८०
अर्धमागधी व्याकरण
(ख) स्थितिदर्शक चतुर्थ्यन्त पदानंतर लगेच विधेय असते.
(१) देवत्ताए उववन्ने। (भग पृ.१९) देव म्हणून जन्मला (२) पुत्तत्ताए उववज्जिही। (समरा पृ.४४) पुत्र म्हणून जन्माला येईल.
(अ) हे चतुर्थ्यन्त पद कधी वाक्यान्ती आढळते.
समुप्पण्णो तीसे गब्भंमि पुत्तत्ताए। (महा. पृ.२८ब) पुत्रत्वाने तिच्या गर्भात गेला.
(८) तुलनेतील पंचम्यन्त पद हे प्रथम असते.
विम्हिया सक्कवण्णिय रूवसिरीओ वि अहिययरं रूवाइसंपयं दटुं। (पाकमा. पृ.७२) इंद्राने वर्णिलेल्या रूपशोभे पेक्षा अधिक रूपातिशय पाहन विस्मिन झाले.
(अ) जोर देण्यास हे पंचम्यन्त पद कधी नंतर ठेवतात
मूढतराए णं तुमं पएसी ताओ कट्ठहारयाओ। (पएसि. परि२८) हे पएसी! त्या काष्ठवाहकापेक्षा तू अधिक मूर्ख आहेस.
(९) (क) षष्ठयन्त पद विशेष्यापूर्वी असते. रन्नो जेटे पुत्ते। (पएसि. परि३) राजाचा ज्येष्ठ पुत्र. (अ) जोर देण्यास कधी षष्ठ्यन्त पद नंतर ठेवतात.
खण भंगुरयाए सरीरस्स चंचलयाए जीवियस्स। (जिन पृ.२) शरीराच्या क्षणभंगुरतेने (व) जीविताच्या चंचलतेने.
(आ) संख्यावाचक संबंधी षष्ठ्यन्त पदहि कधी विशेष्यानंतर येते. सहस्सं सहस्सं काहावणाणं। (अरी. पृ.६) हजार हजार कार्षापण.
(इ) एखाद्या विशेष्याला इतर सर्वनामात्मक विशेषण असल्यास प्रथम ते येते, मग विशेषणात्मक षष्ठ्यन्त पद येते.
इमो मम तणओ। (चउ. पृ.४४) हा माझा मुलगा. (ख) सत्षष्ठी प्राय: उद्देश्यापूर्वी येते.
(१) नलस्स वच्चंतस्स अत्थंगओ गमयमणी। (नल. पृ.६) नल जात असता सूय अस्तास गेला. (२) तत्थ तथा तुम्ह नियंताण चेव अस्सेणावहरिओ कुमारो। (पाकमा. पृ.५४) त्यावेळी तेथे तुम्ही पहात असतांनाच घोड्याने कुमाराला दूर नेले. (अ) कधी सत्षष्ठी उद्देश्यानंतर येते.
जं कुमारा एक्कपए चेव पेच्छंताण चेव अम्ह दड्डा। (पाकमा. पृ.२२) की