________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४७९
सगरोवि पालेइ रज्ज। (पाकमा पृ.१७) सगर सुद्धा राज्य पाळू लागला.
(ख) दोन द्वितीयान्त कर्मांतील व्यक्तिवाचक कर्म प्रथम असते.
एयं कन्नगं इयाणिं न किं पि भणिस्सामि। (महा. पृ.२४३ ब) या कन्येला मी आता काहीहि बोलणार नाही.
(अ) कधी व्यक्तिवाचक कर्म नंतर ठेवतात. तं नियमायरं मग्गेइ। (कथा. पृ.२५) ते आपल्या आईला मागी. (६) (क) तृतीयान्त साधनवाचक पद उद्देश्य व विधेय यामध्ये असते.
(१) तेसिं च एगो मंततंत भूइकरणेहिं जीवइ। (महा पृ.१५५व) त्यातील एक मंत्र, तंत्र, भूति करून जगे (२) आहओ दढं निसियरवग्गेण कंधराए। (चउ. पृ.२८) मानेवर तीक्ष्ण खड्गाने जोरांत प्रहार केला.
(ख) कारणदर्शक तृतीयान्त पद प्रथम येते.
रुहिरनिवहनिग्गमेण धवलीहयं सरीरं। (चउ. पृ.२९) रक्ताचा प्रवाह बाहेर पडल्याने शरीर पांढरे पडले.
(ग) तृतीयान्त उद्देश्य विधेयापूर्वी असते.
(१) ता अप्पमत्तेण मया अप्पा रक्खियव्वो। (जिना. पृ.५३) म्हणून काळजी-पूर्वक मला स्वत:चे रक्षण केले पाहिजे. (२) तुमे निच्चं रायकुले समागंतव्वं। (कथा पृ.१०३) तू रोज राजवाङ्मयात यावेस.
(अ) तृतीयान्त उद्देश्य कधी विधेयानंतर ठेवतात. (१) तओ मुक्को तक्करो रन्ना। (नल. पृ.२३) मग राजाने चोराला सोडले.
(२) तत्थ इमं चिंतियव्वं साहणा। (कथा. पृ.१३२) तेथे साधूने असा विचार करावा.
(७) (क) हेतु-प्रयोजन-दर्शक चतुर्थ्यन्त पद अर्धमागधी आगमांत प्राय: वाक्यान्ती आढळते.
त्तए णं अहं गोयमा कुम्मगामं नयरं संपइट्ठिए विहाराए। (भग पृ.८) गोयमा, नंतर मी विहारासाठी कुम्मगाम नगराकडे निघालो.
(अ) हे चतुर्थ्यन्त पद कधी मध्येच आढळते.
महावीरस्स वहाए सरीरगंसि तेयं निसिरइ। (भग. पृ.२४) महावीराच्या वधासाठी शरीरात तेज सोडले.