________________
४७८
अर्धमागधी व्याकरण
चांगली आहे.
(३) एकविभक्तिक शब्द आपल्या विशेष्यापूर्वी असतात.
एयाओ तस्स तुह वइरिणो नट्टमत्तस्स भगिणीओ। (बंभ. पृ.२) त्या तुझ्या नझुमत्त (नावाच्या) शत्रूच्या ह्या बहिणी.
(अ) विशेषनाम हे प्रायः सामान्य नामापूर्वी येते.
(१) चंपाए नयरीए। (नायासं, पृ.१६२) चंपा नगरीत (२) मोग्गरपाणिस्स जक्खस्स। (अंत. परि.१००) मोग्गरपाणि (नावाच्या) यक्षाचे.
(आ) 'नाम' चा उपयोग असता, विशेषनाम हे सामान्य नामापूर्वी असते नंदणवणे नामं उज्जाणे होत्था। (अंत. ६) नंदणवण नावाचे उद्यान होते.
(इ) विधिनाम हे प्रायः उद्देश्यानंतर येते.
इह परलोए विज्जा कल्लाणहेऊ। (अरी. पृ.१०) इह परलोकांत विद्या ही कल्याणाचा हेतु आहे.
टीप :- जोर देण्यास विधिनाम कधी उद्देश्यापूर्वी ठेवतात.
(१) दुक्खहेयवो विसया। (समरा. पृ.१६०) विषय म्हणजे दुःखहेतु. (२) उवाओ य एस। (समरा. पृ.१६३) आणि हा उपाय आहे.
(४) प्राय: सर्वनामाचे रूप वाक्यारंभी असते.
तस्स रन्नो धारिणी नामं देवी होत्था। (अंत. ८) त्या राजाची धारिणी नावाची राणी होती.
(अ) प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यारंभी असते.
केहिं पुण कम्मेहिं पाणिणो णरएसु वच्चंति। (धर्मो. पृ.४४) कोणत्या बरे कर्मांनी प्राणी नरकाला जातात?
(आ) दर्शक सर्वनाम हे विशेषनामापूर्वी असते. से अज्जुणए अणगारे। (अंत. १२०) तो अजुणय भिक्षु. (५) (क) द्वितीयान्त, कर्म प्रायः क्रियापदापूर्वी असते. (१) अन्नं न गच्छावेजा। (दस ४) दुसऱ्याला जाण्यास सांगू नये.
(२) सो जत्थ सुरूवं दारियं पासइ। (पाकमा पृ.३१) तो जेथे सुरूप मुलगी पाही. (अ) कधी जोर देण्यास क्रियापद अगोदर ठेवतात.
(१) जिणेमि रज्जं नलं। (नल पृ.९) नळ व राज्य जिंकीन (२)