________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४७७
(बंभ. पृ.६५) व हकिकत कळल्यावर तो तुमचे व आमचे मीलन दर समजेल.
(२) एसा लजंती न किं वि तुज्झ साहिउं सक्कइ। (बंभ.पृ.६१) ही लाजेने तुला काहीही सांगू शकत नाही.
(अ) कधी जोर देण्यास क्रियापद वाक्यारंभी रेवतात.
(१) सद्दहामि णं भंते निग्गंथं पावयणं (पएसि परि.९) महाराज व निग्रंथ प्रवचनावर मी विश्वास ठेवतो.
(२) इच्छामि... तुझं अंतिए... धम्मं निसामित्तए। (अंत ८०) तुमच्याकडून धर्म ऐकण्याची माझी इच्छा आहे.
(आ) कथनात ‘अत्थि' हे क्रियापद कित्येकदा वाक्यारंभी ठेवतात. अत्थि कंचणपुरं नाम नयरं। (पाकमा. पृ.६३) कंचणपुर नावाचे नगर होते.
(२) विशेषणे प्रायः त्यांच्या विशेष्यापूर्वी ठेवली जातात.
(१) चडव्विहा देवा आगया। (अंत. १०) चार प्रकारचे देव आले (२) चंपाए नयरीए तओ माहणा भायरो परिवसंति चंपा नगरीत तीन ब्राह्मण बंधु रहात होते.
(अ) सर्वनामात्मक व इतर विशेषणे असता, सर्वनामात्मक विशेषणे प्राय: प्रथम असतात (१) एसा वि मम जेट्ठा भइणी। (महा. पृ.१६३अ) ही हि माझी ज्येष्ठ भगिनी (२) एस एक्को चेव मे सुओ। (पाकमा पृ.२३) हा माझा एकच पुत्र.
(आ) एखाद्या विशेष्याला पुष्कळ विशेषणे असल्यास ती विशेष्यानंतर ठेवली तरी चालते.
(१) एक्कं पुरिसं पासइ जुण्णं जराजजरियदे हं। (अंत. ५९) एका वृद्ध, जराजर्जरित देही पुरुषाला पहातो. (२) एगं गोवच्छं थोरगत्तं सेयं पेच्छइ। (चउ पृ.२२) एक पांढरे, भरदार अंगाचे गाईचे वासरू पाहिले.
(इ) विधिविशेषण हे प्राय: उद्देश्यानंतर येते.
सव्व चेव संसारियं वत्थु विवागदारुणं। (समरा. १७६) संसारातील सर्वच वस्तु परिणामी दारुण आहेत.
टीप :- कधी जोर देण्यास विधिविशेषण अगोदर ठेवतात.
(१) विचित्ताणि खु विहिणो विलसियाणि। (समरा. पृ.२०३) दैवाचे खेळ खरोखर विचित्र असतात. (२) सोहणो एक अवसरो। (चउ. पृ.२८) ही वेळ