________________
प्रकरण ३०) वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
888888888888888888888888888888888888888888888888888888
४४३ वाक्यातील शब्दक्रम
अर्धमागधीत खरे म्हणजे वाक्यातील शब्दक्रमाला फारसे महत्त्व नाही. याचे मुख्य कारण असे की वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध हा त्यांच्या विशिष्ट रूपांनी ठरलेलाच असतो; त्यामुळे जरी शब्दक्रम बदलला तरी अर्थ बदलण्याची भीति नसते.
तथापि याचा अर्थ असा नव्हे की वाक्यात हवे तसे शब्द ठेवून द्यावेत. उलट, कित्येकदा काही विशिष्ट क्रमानेच वाक्यांत शब्दांचा, उपयोग करणे अगत्याचे असते अर्धमागधीवाक्यातील शब्दक्रम हा थोड्याफार प्रमाणात संस्कृतसारखाच आहे, कधी तो जरा अनिर्बंध आहे. त्यामुळे शब्दक्रमाबद्दलचे अगदी ढोबळ नियम सांगता येतील.३
(१) वाक्यारंभी उद्देश्य, वाक्यान्ती क्रियापद; मध्ये इतर शब्द असतात. (१) सो य मुणिय वइयरो तुम्हमम्हंच समागमणं सुंदर मन्निस्सइ।
पद्यांतील शब्दक्रम हा वृत्तनियंत्रणामुळे जवळ जवळ अनिर्बंध असतो. त्यामुळे येथे उल्लेखिलेला विशिष्ट शब्दक्रम हा गद्यांतील वाक्यांना उद्देशून आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वक्त्याच्या वा लेखकाच्या मर्जीप्रमाणे किंवा वाक्यातील एखाद्या भागावर जोर द्यायचा असल्यास, या ढोबळ नियमांना सुद्धा कित्येकदां बाजूला सारण्यात येते. अगदी सामान्यपणे वाक्यातील शब्दक्रम असा :- स्थलकालदर्शक क्रियाविशेषणे वा क्रियाविशेषणात्मक वाक्यांश आरंभी; नंतर विशेषणे वा विशेषणात्मक वाक्यांश अथवा उद्देश्यावलंबी संबंधी वाक्ये यासह उद्देश्य ; मग विशेषणे वा विशेषणात्मक वाक्यांश अगर कर्मावलंबी संबंधी वाक्ये यासह कर्म; त्यानंतर क्रियाविशेषण अव्यये ; शेवटी क्रियापद.