________________
४८६
अर्धमागधी व्याकरण
(अ) कधी आज्ञार्थी क्रियापद मध्ये आढळते.
ता तुमं निब्भया गच्छ एयंमि नयरे। (चउ. पृ.१८) तेव्हा तू निर्भयपणे या नगरांत जा.
(आ) दोन आज्ञार्थी क्रियापदातील एक आरंभी व एक अंती असते; तर कधी दोन्ही आपापल्या वाक्यारंभी असतात.
(१) गच्छह तुम एयं दारगं एगते उकुरुडियाए उज्झाहि। (निरया. पृ.१३) जा तूं; या मुलाला एके ठिकाणी उकिरड्यावर टाक.
(२) परिच्चयसु सोगं करेसु परलोगहिंय। (पाकमा. पृ.२४) शोक टाक, परलोक हित कर. ४४४ वाक्यक्रम
वाक्यक्रमाबाबत हि शब्द क्रमाप्रमाणे खालील ढोबळ नियम सांगतां येतील. (अ) मिश्रवाक्य :मिश्रवाक्यांत प्रायः गौण वाक्य प्रथम, नंतर प्रधान वाक्य असते. (१) 'ज' या संबंधी सर्वनामाने आरंभी होणारे वाक्य प्रथम असते.
(१) जो मे सह जलणंमि पविसइ तस्साहं भारिया हवामि। (धर्मो. पृ.१३८) जो माझ्या बरोबर अग्नीत प्रवेश करील त्याची मी भार्या होईन. (२) जं भे रुच्चइ तं करेसु। (कथा. पृ.१७८) जे तुला आवडेल ते कर.
(अ) जोर देण्यास कधी 'ज' चे वाक्य नंतर ठेवतात.
सो वि धन्नो जो तस्स अन्नपाणाइगं देइ। (जिन. पृ.३) जो त्याला अन्न पाणी, इत्यादि देतो तोहि धन्य होय.
(२) 'इति' ने निर्दिष्ट होणारे अपरोक्ष कथनात्मक वाक्य प्राय: प्रथम असते. एसो वि न मे मणमाणंदइ त्ति कहियं कुमरीए। (नल. पृ.४) हा सुद्धा माझ्या मनाला आनंद देत नाही, असे राजकन्येने सांगितले.
(अ) कधीं 'इति' ने निर्दिष्ट होणारे वाक्य नंतर ठेवतात. जंपिय मए - भाग धेयाणि मे पुच्छह त्ति। (समरा. पृ.५१०) माझ्या नशिबाला विचारा असे मी म्हटले.
(३) 'जहा' व ‘एवं' हे शब्द असणाऱ्या वाक्यानंतर अपरोक्ष कथनात्मक वाक्य येते :- (१) वत्तव्वं च तए जहा - महाराय सक्को तुम्हं वत्तं पुच्छइ।