________________
अर्धमागधी व्याकरण
= चोर, गौरी = गोरी, गौतम = गोयम, कौमुदी = कोमुई (चांदणे), लौकिक = लोइय.
३८ औ = अउ : (अउ: पौरादौ च । हेम. १.१६२)
गौड = गउड (गौड देश), मौलि = मउलि (डोके), पौर = पउर (नागरिक), सौध = सउह (चुनेगच्ची वाडा), कौशल = कउसल, पौत्र = पउत्त, (मुलाचा मुलगा).
३९ औ चे अनियमित विकार
वर उल्लेखिलेल्या विकाराखेरीज औ चे इतर काही विकार आढळतात. ते असे :
औ = आ : गौरव = गारव, (नौ = नावा). औ = उ१ : दौवारिक - दुवारिय (द्वारपाळ), पौलोमी = पुलोमी
(इंद्राची पत्नी), सौवर्णिक = सुवण्णिअ (सोन्याचे).
४० एकाच शब्दात होणारे औ चे अनेक विकार
कधी एकाच शब्दात औ चे अनेक विकार होतात. असे काही शब्द पुढीलप्रमाणे : गौरव, गउरव, गारव; पौरुष = पोरिस, पउरिस; रौद्र = रोद, रउद्द.
४१ स्वरांचे अनियमित विकार
__ अर्धमागधीत नसलेल्या ऋ, ऋ, ल, ऐ व औ या स्वरांचे कोणते विकार होतात हे वर सांगितले आहेच. आता या स्वराखेरीज इतर स्वर जरी अर्धमागधीत
१ सौंदर्य इत्यादी शब्दात औ चा उ होतो असे हेमचंद्राने (उत्सौंदर्यादौ ।
१.१६०) म्हटले आहे. पण काही शब्दात पुढे जोडाक्षर असल्याने औ चा
ओ होऊन मग हस्व उ झाला आहे, असेही म्हणता येईल. म्हणून वर दिलेले शब्द औ पुढे जोडाक्षर नसलेले असेच दिले आहेत.