________________
प्रकरण ३ : स्वरविकार
४७
आहेत तरी संस्कृतशब्दातील त्या स्वरांचे स्थानी कधी कधी इतर स्वर येतात. ही माहिती आता पुढे दिली आहे.
४२ अ बद्दल येणारे इतर स्वर अ = आ : (अत: समृद्ध्यादौ वा । हेम. १.४४) : समृद्धि = सामिद्धि,
प्रमुख = पामोक्ख, चतुरंत = चाउरंत (चार बाजू असलेला), गृहपति = गाहावइ (घरस्वामी), चतुरंगिणी = चाउरंगिणी (सैन्य), चतुर्दशी = चाउद्दसी.
अ = इ : (इ: स्वप्नादौ । हेम. १.४६) : स्वप्न = सिविण, ईषत् =
ईसिं (थोडेसे), पक्व = पिक्क, मध्यम = मज्झिम, उत्तम = उत्तिम, चरम = चरिम (शेवटचा), मज्जा = मिंजा (मगज), मृदंग = मुइंग, अंगार = इंगाल (निखारा), कृपण = किविण.
अ = ई :
हर : हीर (शंकर)
अ = उ : श्मशान = सुसाण, म्लेच्छ = मिलक्खु, प्लक्ष = पिलक्खु
(पिंपरी), दोषज्ञ = दोसन्नु (दोष जाणणारा), विधिज्ञ = विहिन्नु (विधि जाणणारा), सर्वज्ञ = सव्वन्नु, कृतज्ञ = कयन्नु.
अ = इ :
(एच्छय्यादौ । हेम. १.५७) : शय्या : सेज्जा, अत्र = एत्थ (येथे), सौंदर्य = सुंदर
१ (अ) पुढील शब्दात पहिल्या अ चा विकल्पाने आ होतो :
समृद्धिः प्रतिसिद्धिश्च प्रसिद्धिः प्रकटं तथा । प्रसुप्तं च प्रतिस्पर्धी मनस्वी प्रतिपत्तथा ।। अभियाति: सदृक्षं च समृद्ध्यादिरयं गणः ।। मार्क. १.३ (आ) म. : काय - काया, संप्रदाय-सांप्रदाय, स्तन-थान.