________________
प्रकरण ३ : स्वरविकार
वैतरणी = वेयरणी (यमलोकाची नदी), वैश्रमण = वेसमण (कुबेर), वैराग्य = वेरग्ग, शैल = सेल (पर्वत), शैवल = सेवल (शेवाळ), वैद्य = वेज, मैत्री = मत्ती, नैरयिक = नेरइय (नरकातील प्राणी), भैषज्य = भेसज्ज (औषध), ऐश्वर्य = एसज्ज.
३४ ऐ = अइ : (अइदैत्यादौ च । हेम. १.१५१)
दैत्य = दइच्च, स्वैरम् = सरं, कैलास = कइलास, दैव = दइव्व, ऐश्वर्य = अइसरिय, वैशाख = वइसाह, दैन्य = दइन्न, वैश्य = वइस्स.
३५ एकाच शब्दात होणारे ऐ चे अनेक विकार
कधी एकाच शब्दात ऐ बद्दल ए व अइ असे दोन्हीही विकार होतात. असे काही शब्द पुढीलप्रमाणे : ऐश्वर्य = एसज्ज, अइसरिय; वैर = वेर, वइर; सैन्य = सेन्न, सइन्न.
३६ ऐ चे अनियमित विकार ___वर सांगितल्याखेरीज ऐ चे बाबतीत आणखी काही विकार होतात. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. हे विकार असे :
ऐ = इ : नैयोगिक : निओइय (नियोजन करणारा). ऐ = ई : धैर्य = धीर
३७ औ२ = ओ : (औत ओत् । हेम. १.१५९)
द्वौ = दो (दोन), पौराण = पोराण (पुरातन), क्षौम = खोम (रेशमी वस्त्र), गौर = गोर, कौशांबी = कोसंबी (एका नगरीचे नाव), यौवन = जोव्वण, चौर
१
पुढील शब्दांत ऐ चे विकल्पाने ए व अइ होतात : दैवं भैरव-कैरव-चैत्रा: कैलास-वैर-जैत्राद्याः । मार्कंडेय १.४४ म. : गौर - गोरा, द्वौ - दोन, चौर - चोर. हिंदीत - यौवन - जोबन.
२