________________
४६८
(५) संकेत
संयुक्तवाक्यें पुढील प्रमाणे जोडली जातात :
--
जइ, अह (-तो, ता, तओ), चे' (चेत्) (तरिहि (तर्हि ))
(१) समुच्चय :- च, य; न च, न य; तदणु, तयणु; इओ य, तहाय, अवि (अपि), अवि य, केवलं - अवि, किं पुण, अह (अथ), पुव्वं - तओ; अणंतरं, अणंतरं च, तओ य (तत:च), अन्नं च, अवरं च, किंच, यावि (चापि), तयणंतरं, पढमं-पच्छा, तओ परं ( तत: पर), ताव (प्रथम) तओ.
(२) विकल्प : - वर, व; वा वा; किंवा, अहवा, न वा; उय (उत), उदाहु, उयाहु, उदाहो; अन्नहा; इयरहा, इहरा.
(३) विरोध :- तु, उ; किंतु, परंतु; परं, पुण, केवलं, तहवि (४) कार्यकारण :- ता, तो, तओ; अओ (अत:) तम्हा (तस्मात्) या सर्वांचीच उदाहरणे येथे ग्रंथविस्तार भयास्तव दिलेली नाहीत. पुढे मात्र काही उदाहरणे दिली आहेत.
४३५ नामवाक्य जोडणें
(१) ‘इति’ ने अपरोक्ष विधान, एखादा विचार किंवा (एखाद्या शब्दाचें) स्पष्टीकरण दर्शविले जाते.
३
४
५
अर्धमागधी व्याकरण
(१) अहो मम सामत्थं एस न मुणइ त्ति विगप्पिऊण। (महा. पृ.१७५अ) अहो! हा माझे सामर्थ्य जाणत नाही, असा विचार करुन. (२) अज्जेयव्वं धणं ति मह इच्छा। (जिन. पृ. १४) धन मिळवावे अशी माझी इच्छा आहे. (३) मम साहुवादो होइ त्ति बुद्धीए निग्गओ। (कथा. पृ. १०९) मला साधु म्हणतील, या बुद्धीने निघाला.
(२) ‘जहा’ ने अपरोक्ष‘विधान, एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण, तसेच ऐकणे, जाणणे, इत्यादि क्रियापदांची वाक्यरूप कर्में निर्दिष्ट होतात.
१ 'चे' चा उपयोग अर्धमागधीत क्वचित् आढळतो.
२
सुर. १.१३२ 'तरिहि' चा उपायोग हि तुरळक आहे. ‘अव्ययांचे उपयोग' या प्रकरणांत पुष्कळ उदाहरणे सापडतील
'इति' हे अपरोक्ष विधान, इत्यादीनंतर येते.
'जहा' हें अपरोक्ष विधान, इत्यादीपूर्वी येते.