________________
प्रकरण २९ : वाक्ये जोडणे
४६९
(१) तेण भणिया सा जहा-मयच्छि भगिणी तुमं मेहोसि। (महा. पृ.१६२ अ) त्याने तिला असे म्हटले ‘मृगाक्षी! तूं माझी बहीण आहेस' (२) जाणामि जहा सो धुत्तो। (पाकमा पृ.४५) मला माहीत आहे की तो धूर्त आहे. (३) जायाय पसिद्धी जहा- चंडकोसिओ उववणं अवलोइउं, पि न देइ। (महा. पृ.१७४अ) आणि प्रसिद्धी झाली की चंडकोसिय उपवन पाहूं सुध्दां देत नाही. (३) जं :मा भणह जं न भणियं। (सुर. २.१४) (असे) म्हणू नका की सांगितले नव्हते. (४) जइ :- पेच्छ जइ मम पासे संति। (कथा. पृ.१११) माझ्याजवळ आहेत की नाहीत ते पहा.
(अ) कधी पूर्ववाक्यात पुढील वाक्याबद्दल एखादा शब्द येऊन वाक्ये जोडली जातात.
(१) सच्चं खु एयं - जो खीरं पाएइ सो वि डसिज्जइ तुह जाईए। (नल. पृ.२७) हे अगदी खरे की जो दूध पाजतो तो सुद्धा तुझ्या जातीकडून चावला जातो. (२) ताहे तुब्भे एवं वयह-अम्हे तारयाहि। (नामासं, पृ.१२७) तेव्हा तुम्ही असे म्हणा - ‘आम्हाला तार'. ४३६ विशेषणवाक्य जोडणे
(१) ज:- (१) तं नत्थि जं न कुव्वंति पाणिणो साहसं दविणकज्जे। (सुपास. ५२३) पैशासाठी प्राणी जे करणार नाहीत असे कोणतेहि साहस नाही. (२) आणेह दव्वाणि जाणि अहं उवदिसामि। (वसु. पृ.२१८) मी सांगतो ती द्रव्ये आणा.
(२) जारिस :- (१) मूलदेवेण वि एरिसो सुमिणो दिट्ठो जारिसो मए'। जसले स्वप्न मी पाहिले तसले मूलदेवाने हि पाहिले (२) जारिसं कल्ले परिविटुं तारिसं अणुदिणं दायव्वं। (धर्मो. पृ.२००) काल जसले वाढले तसले रोज द्यावे (३) जारिसए मम ओरोहे तारिसए तो अन्नस्स। (नायासं, पृ.११०) जसले माझे अंत:पुर आहे तसले दुसऱ्याचे नाही.
१ २
इंग्लिश मधील if, whether प्रमाणे घाटगे, पृ.२१६