________________
प्रकरण २९) वाक्ये जोडणे
82828282828282828282828282 SABASABASABASABASASALALALALA
४३४ वाक्ये जाडणे
एका वाक्यातून प्राय: जरी पूर्ण अर्थबोध होत असला तरी कित्येकदा वाक्ये परस्परावलंबी असतात; त्यातील एक वाक्य प्रधान व इतर वाक्ये गौण असतात. पुष्कळदां दोन स्वतंत्र वाक्येहि काही विशिष्ट कारणास्तव जोडली जातात; येथे गौण प्रधान-भाव मात्र असत नाही. पहिल्या प्रकाराला मिश्र वाक्ये, व दसऱ्या प्रकाराला संयुक्त वाक्ये, असे म्हटले जाते.
मिश्र वाक्यांतील गौण वाक्ये ज्या प्रकारचे कार्य करत असतील त्यानुसार त्यांना नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषणवाक्य, इत्यादी संज्ञा दिल्या जातात.
खालील शब्दांच्या साहाय्याने ही वाक्ये जोडली जातात.
(१) नामवाक्य :- ति (इति), जहा, जं (यद्) (की), (तं जहा (तद् यथा), जइ (यदि))
(२) विशेषणवाक्य :- ज (यद्) (त (तद्)), जारिस (यादृश) (तारिस (तादृश))
(३) क्रियाविशेषण वाक्य :
(१) स्थळदर्शक :- जत्थ (-तत्थ), जत्थजत्थ (-तत्थ तत्थ), जहिं (तहिं), जहिं जहिं (-तहिं तहिं) ,जत्तो (जेथून) (-तत्तो) (तेथून)
(२) काळदर्शक :- जया, जइया, जाहे (-तया, तइया, ताहे), जया जया (-तया तया), जाव (-ताव), जाव न (-ताव), जप्पभिंड (-तप्पभिई).
(३) रीतिदर्शक :- इव, जहा (-तहा), हि, जेण-णं (-तेण णं), ति (इति), जाव (म्हणजे)