________________
४६६
अर्धमागधी व्याकरण
२) संपूर्ण वाक्याबद्दल संबंधी सर्वनाम येत असेल तर ते नेहमी नपुं द्वितीया ए. व. त. असते.
१) अजुत्तं कयं इमीए जं तुमं वरिओ। (नल. पृ. ५) तुला वरिले, हे हिने अयोग्य केले. २) जुत्तं तुमए कयं जं पारद्धी मंसंच परिचत्ताणि। (नल., टीपा, पृ. १) मृगया व मांस वर्ण्य केलेस, हे तू चांगले केलेस.
३) ज्या वाक्यात संबंधी सर्वनाम आहे त्याचे विधेय नाम असून त्याचे लिंग पूर्वगामी नामापेक्षा भिन्न असेल, तर संबंधी सर्वनाम प्रायः संनिधच्या नामाप्रमाणे असते. __जे माहणा जाइविज्जाविहूणा ताई तु खेत्ताई सुपाव याइं। (उत्त. १२.१४) जे जाति-विद्या-हीन ब्राम्हण आहेत ते पापी क्षेत्रे होत.