________________
प्रकरण २८ : संवादित्व
४६५
१) न सामन्नपुरिसो एसो। (नल पृ. ५) हा सामान्य पुरूष नाही. २) तम्मि चेव जम्मे। (समरा पृ. ४५) त्याच जन्मांत ३) इमस्स सत्तंगरजस्स। (नल. पृ. ८) या सप्तांग राज्याचे
अ) भिन्नलिंगी अनेक नामांबद्दल सर्वनाम येत असल्यास ते कधी पुल्लिगांत तर कधी नपुंसकलिंगात आढळते.' ____क) १) कसाया इंदियाणि य ते जिणित्तु। (उत्त. २३.३८) कषाय व इंद्रिये त्यांचे दमन करून २) नाणं च दसणं चेव चरित्तं च तवो तहा। एस मग्गो। (उत्तं २८.२) ज्ञान, दर्शन, चारित्र व तप हा मार्ग
ख) नाणं च दंसणं चेव चारित्तं च तवो तहा। वीरियं उवओगो य एयं जीवस्स लक्खणं ।। (उत्त २८.११) ज्ञान, दर्शन, चारित्र, तप वीर्य, उपयोग हे जीवाचे लक्षण.
नाम-संबंधी सर्वनाम संवाद :१) पूर्वगामी नामाप्रमाणे सर्वनामाचा पुरूष, लिंग व वचन असते. अ) विभक्ति कधी तीच असते :
१) ते धन्ना कयपुण्णा जे जिणधम्मं धरंति नियहियए। (कुम्मा ८९) जे जिनधर्म हृदयात धरतात ते धन्य व पुण्यवान २) जा निरस्साविणी नावा सा उ पारस्स गामिणी। (उत्त. २३.७१) जी नाव गळकी नाही तीच पलीकडे जाते.
आ) कधी पुढील वाक्यांत संबंधी सर्वनामाची जी विभक्ती असते तीच :
१) मुसं न वयई जो उं तं वयं बूम माहणं। (उत्त. २५.२४) जो खोटे बोलत नाही त्याला आम्ही ब्राम्हण म्हणतो. २) जीवइया पयत्था जाणिज्जति इह जेणतं नाणं (सुपास. ५५१) ज्याचे योगाने येथे जीव इत्यादी पदार्थ जाणले जातात, ते ज्ञान. १ भिन्नलिंगी नामे 'च' ने अथवा 'वा' ने जोडलेली असल्यास सर्वनाम कधी
संनिधच्या नामाप्रमाणे असते. १) सव्वे देवा देवीओ य उव्विग्गा अच्छंति। (महा. पृ. २३० ब) २) सो पुरसिो इत्थिया वा। (समरा पृ. २०४)
३) जो पुरिसो इत्थी वा। (कथा पृ. ४०) २ अपवाद : अच्छंदा जेन भुंजंति न से चाइ त्ति वुच्चइ। (दस २.२)