SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 461
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४६० अर्धमागधी व्याकरण ३) उद्देश्ये पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असता धातु. विशेषण हे प्रायः पुल्लिंगात आढळते. १) उट्ठिओ कुमारो संतिमई य। (समरा पृ. ५३३) कुमार व शांतिमती उठले २) ताहे राया य सा य जयहत्थि म्मि आरूढा । (चउ पृ. १७) नंतर राजा व ती जयावह हत्थीवर बसले. ३) अणुरूवो ते विवेगो अलुद्धया य । (समरा पृ. ४६५) तुझा विवेक व अलुब्धता अनुरूप आहेत. अ) कधी संनिधता उद्देश्याप्रमाणे धातसाधित विशेषण आढळते. एवंविहा य देवा देवीओ कत्थ दिट्ठाओ। (सुर ६.१३१) अशा प्रकारचे देव व देवी कोठे बरे पाहिले होते ? आ) नंतरच्या प्राकृतांत धातुसाधितविशेषण प्रायः नपुंसकलिंगात' आढळते. १) समाइट्ठाणि वज्झाणि मेंठो देवी करी य । (धर्मो पृ. ५०) माहूत, हत्ती व राणी हे वध्य अशी आज्ञा केली. २) तत्थ वसुदेवो रोहिणी देवई य आरोवियाणि। (कथा. पृ. ८६) तेथे वसुदेव रोहिणी व देवकी यांना बसविले. ४३१ ३) उद्देश्य - विधिनाम - संवाद १) विधेय - नामाच्या स्वरूपाप्रमाणे हा संवाद भिन्नरूपी असतो. विभक्ति तीच असते. लिंग- वचनाचे बाबतीत मात्र अ) कधी लिंग-वचन - संवाद असतो. १) सव्वे आभरणा भारा। (उत्त १३.१६) सर्व अलंकार (म्हणजे ) भार. २) जम्मं दुक्खं। (उत्त १९.१५) जन्म म्हणजे दुःख ३) महिला जोणी अणत्थाणं। (बंभ. पृ. ४२ ) स्त्री ही अनर्थांचे मूळ आहे. ४) मोक्खो पहाणपुरिसत्थो। (कथा पृ. १६९) मोक्ष हा प्रधान पुरुषार्थ. आ) कधी लिंगभिन्नता असते; पण वचनसंवाद असतो. १) धम्मो मंगलमुक्कट्ठ। (दस १.१) धर्म हे उत्कृष्ट मंगल २) संपयं दमयंती चेव तुह भज्जा मंती मित्त पाइक्को य। (नल पृ. ११) आता दमयंती हीच तुझी भार्या, मंत्री, मित्र व पायदळ ३) धम्मो दीवो पट्ठा य गई सरणमुत्तमं। (उत्त २३.६८) धर्म हाच दीप, प्रतिष्ठा, गति व उत्तम आश्रयस्थान. १ म. : राजा व राणी आली, इत्यादी
SR No.007784
Book TitleArdhamagdhi Vyakaran
Original Sutra AuthorN/A
AuthorK V Apte
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages513
LanguageMarathi
ClassificationBook_Devnagari
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy