________________
प्रकरण २८ : संवादित्व
४५९
४) अलंघणीया आणा तायस्स। (सुर. ११.१४१) बापाची आज्ञा अलंघ्य आहे. ___ अ) धातुसाधितविशेषण हे कधी उद्देशाच्या एकविभक्तिक नामाप्रमाणे असते : छज्जीवणिया नाम अज्झयणं पवेइया। (दस. ४) 'सहा जीवसमूह' नावाचे अध्ययन सांगितले आहे.
आ) धातुसाधितविशेषण कधी उद्देश्याच्या एकविभक्तिक पूरकाप्रमाणे असते. १) मुच्छा परिग्गहो वुत्तो। (दस ६.२१) आसक्तीला परिग्रह म्हणतात. २) सूरसेणा जाओ देवो। (कथा पृ. ३३) सुरसेणा देव झाली. क) उद्देश्य-धातुसाधितविशेषण वचन संवाद
१) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असता धातु साधित विशेषण अ. व. त. १ असते.
१) हक्कारिया रायाणो रायपुत्ता य (नल. पृ. २) राजे व राजपुत्र यांना बोलावले. २) मए सोढाणि भीमाणि जम्माणि मरणाणि य। (उत्त १९.४६) मी भयंकर असे जन्म व मृत्यु सहन केले.
अ) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असतां ही धातु. विशेषण कधी संनिधच्या उद्देश्याप्रमाणे असते.
१) गहियं उयगं नारंगफलाणि य। (समरा पृ. ३५६) पाणी आणि नारंगफळे घेतली. २) आणंदिओ मुणिचंदो देवीओ सामंता य। (समरा पृ. ७९०) मुणिचंद, राण्या आणि सामंत आनंदित झाले.
ख) उद्देश्य-धातुसाधितविशेषण लिंग संवाद : ।
उदा. १) अणुवेहणिजा खलु रोगा सत्तुणो य। (महा पृ. २०३ अ) रोग व शत्रु हे खरोखर अनुपेक्षणीय आहेत. २) पत्ता देवा णरा सट्टाणे। (धर्मों पृ. १५) देव व माणसे आपापल्या स्थानी गेले.
२) अनेक उद्देश्ये स्त्रीलिंगी असता, धातुसाधितविशेषण स्त्रीलिंगात असते.
आगयाओ साहुणीओ कंतिमई य। (समरा पृ. ११२) साधु स्त्रिया व कांतिमती आल्या. १ अपवाद : संपयं च दव्वहरणं परिमोसो य केण विकयं। (घाटगे, पृ. १६१
पहा) आताच कोणीतरी द्रव्यहरण व चोरी केली.