________________
४५८
अर्धमागधी व्याकरण
उद्देश्याप्रमाणे पुरुष घेते.
किं भणिही रुट्ठो जणो अहं वा भइणी वा मज्झ जणणी वा। (कथा पृ. १०१) रागावलेले लोक किंवा मी अथवा बहीण वा माझी आई काय म्हणेल? ४३० २) उद्देश्य-विधिविशेषण-संवाद
१) उद्देश्य-गुणविशेषण : १) उद्देश्याच्या लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे गुणविशेषण असते.
१) सव्वतिहुयणसाहारणं इमं मरणं। (पाक. पृ. २३) हे मरण सर्व त्रिभुवनाला साधारण आहे. २) उत्तमधम्मसुई ह दल्लहा। (उत्त १०.१८) उत्तम धर्म ऐकण्यास मिळणे हे खरोखर दुलर्भ आहे.
३) नूणं मियभासिणो गरुया। (महा. पृ. १४५ अ) हे मोठे लोक खरोखर मितभाषी असतात.
अ) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असता विधिविशेषण संनिधच्या उद्देश्याप्रमाणे असते.
१) जेसिं पिओ तवो संजमो य ती य बंभचेरं च। (दस. ४.२८) ज्यांना तप, संयम, शांती व ब्रह्मचर्य प्रिय आहे
२) संसग्गी संभासो य सुहयरो पुन्नपुरिसाण। (सुपास ५४६) पुण्य पुरुषाशी सहवास व संभाषण सुखकर असते.
२) उद्देश-धातुसाधितविशेषण-संवाद १) उद्देश्याच्या लिंग, वचन विभक्तीप्रमाणे धातुसाधितविशेषण असते. १) मए भोगा भुत्ता। (उत्त १९.११) मी भोग भोगले २) चलिय सेन्नं समत्थं पि। (अगड पृ. १८०) सर्व सैन्य सुद्धा चालले
३) तओ सा किंचि सत्था जाया। (बंभ. पृ. ६१) मग ती किंचित् स्वस्थ झाली
१ द्विवचनाऐवजी अ. व. असते : १) परिसुक्काओ भुयाओ... मिलाणाई
लोयणाई। (समरा पृ. ४८०) २) दो वि केवलिणो जाया। (धर्मो पृ. २१) २ कधी लिंग-भिन्नता आढळते : मह मणो उव्विग्गं संसाराओ । (कथा पृ.
१७६) माझे मन संसारात उद्विग्न झाले आहे; वाऊ चित्तमंत अक्खाया। (दस ४) वायु सजीव आहे असे म्हटले जाते.