________________
प्रकरण २८ : संवादित्व
४६१
इ) कधी लिंग व वचन यांचा संवाद नसतो.
१) सल्लं कामा विसं कामा। (उत्त ९.५३) काम हे शल्य आणि विष आहेत.
२) सम्मदंसणनाणचरित्राणि निव्वाणमग्गो। (धर्मो पृ. १४२) सम्यग् दर्शन, सम्यग् ज्ञान आणि सम्यक् चारित्र हा मोक्षमार्ग.
२) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असता विधिनाम अ. व. त. आढळते. १) माया अलियं लोहो मूढत्तं साहसं असोयत्तं। निस्संसया तह च्चिय महिलाण सहावया दोसा।। (अगड. १४०)
कपट, असत्य, लोभ, मूढत्व, साहस, अशुचिता व क्रुरता हे स्त्रियांचे स्वाभाविक दोष. २) ताणं च दो पहाणसीसा धम्मघोसो धम्मजसो य । (धर्मो पृ. २१५) त्यांचे धर्मघोष व धर्मयश हे दोन मुख्य शिष्य.
अ) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडली असून जर एखादी (समूहवाचक) संयुक्त कल्पना निर्दिष्ट होत असेल तर विधिनाम ए.व.त. येते.
सच्चं सोयं आकिंचणं च बभं च जइधम्मो । (समरा पृ. ४६) सत्य, शौच अकिंचनता व ब्रह्मचर्य हा यतिधर्म.
३) प्रमाण, भाजन, स्थान, पद, शरण ही नामे विधेय असता ती नेहमी नपुं. प्रथमा ए. व. त. असतात मग उद्देश्याचे लिंग-वचन कोणतही असो;
१) गिहेसु महिलाओ पमाणं। (पाइ. पृ. २८) घरांत महिला प्रमाण. २) भायणं तुमं कल्लाणाणं। (समरा. पृ. ७३२) तू (म्हणजे) कल्याणस्थान. ३) जीवो जोइट्टाणं। (उत्त १२.४४) जीव हा वेदी (अग्नीचे स्थान) ४) अवमाणपयं तओ जाओ। (सुपास ५०९) मग तो अपमानस्थान झाला. ५) धम्मो च्चिय संसारे सरणं। (सुपास. ५७४) संसारात धर्म हाच आश्रयस्थान.
क) विभक्तिसंवाद :
१) असणे, होणे, वाटणे, इत्यादी अकर्मक क्रियापदांचे पूरक म्हणून येणारे विधिनाम हे उद्देश्याप्रमाणे प्रथमा विभक्तीत असते.
जाया सव्वे वि केवलिणो। (महा पृ. २.७१) सर्वचा केवली झाले. येथे असणे क्रियापद योजिले-ते मात्र उद्देश्याप्रमाणे असते : अहमेव दुहभायणं होमि। (नल पृ. १४) मीच दुःखाचे आश्रयस्थान होईन.