________________
४५६
अर्धमागधी व्याकरण
अ) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असूनही क्रियापद कधी संनिधच्या उद्देश्याप्रमाणे वचन घेते.
जाण फलाण नामं तुमं अन्नो य न जाणइ। (धर्मो पृ. ६८) ज्या फळांचे नाव तू व इतर कोणी जाणीत नाही.
आ) अनेक उद्देश्ये 'च' ने जोडलेली असून, प्रत्येक उद्देश्य स्वतंत्रपणे विचारांत घेतलेले असेल किंवा सर्व मिळून एक संयुक्त कल्पना होत असले तर क्रियापद ए. व. त येऊ शकते.
१) छारो धूली उदगाइयं च खिप्पइ। (धर्मो पृ. १५९) माती (श-राख) धूळ, पाणी वगैरे फेकले जाते २) वजं नढें गेयं अइरम्मं तह य गंधमाईयं हरइ मणं। (नाण. १०.२९३) वाद्य, नृत्य (नाट्य), गाणे व अतिरम्य गंध इत्यादी मन हरण करते.
इ) अनेक उद्देश्ये - प्रत्येक उद्देश्य स्वतः ए. व. त. - 'च' ने जोडलेली असतां' क्रियापद कधी ए. व. त. तर कधी अ. व. त. असते. ___ यं) १) हाणी वुड्डी य होइ । (पउम. ३.३३) हानी आणि वृद्धी होते. २) थुई निंदा य पयट्टइ । (कथा पृ. ४१) स्तुती व निंदा सुरू होते.
र) तओ नलो दमयंती य कयाइ जलकीलं कुणंति। (नल पृ. ७) नंतर नल व दमयंती कधी जलक्रीडा करीत.
ई) 'च' ने जोडलेली अनेक उद्देश्ये अ. व. त. असल्यास क्रियापद साहजिकच अ. व. त. असते.
समणं भगवं महावीरं निग्गंथा य निग्गंथीओ य वदंति। (सूय. २.१.७) श्रमण भगवान् महावीराला भिक्षु व भिक्षुणी वंदन करतात.
उ) अनेक उद्देश्ये भिन्न वचनी असून 'च' ने जोडलेली असता, क्रियापद
१ 'च' अध्याहृत असताहि क्रियापद ए. व. त. : १) महिला पुत्तो सुही होऊ।
(धर्मो पृ. २०८) पत्नी व पुत्र सुखी होऊ देत. २) वड्डइ तेओ कित्ती माहप्पं सयलसत्थविण्णाणं। कधी अपवाद : न तस्स माया व पिया व भाया कालम्मि (धर्मो पृ. १७३) तम्मं सहरा भवंति। (उत्त १३.२२) मरणकाळी त्याची आई वा पिता वा भाऊ त्याच्या (कर्माचा) भाग घेत नाहीत