________________
प्रकरण २८ : संवादित्व
४५५
अ) उद्देश्य -विधेय-संवाद ४२९ उद्देश-क्रियापद-संवाद
१) विधेय क्रियापद असतां उद्देश्याच्या पुरूष वचनाप्रमाणे क्रियापदाचे पुरुष व वचन असते.
१) अहमवि तं कन्न जीवावेमि। (अरी पृ.८) मी ही त्या कन्येला जिवंत करीन २) जइ न कुप्पह तुब्भे। (बंभ पृ. ५७) जर तुम्ही रागावणार नसाल ३) रक्खिंसु नराहिवा। (महा. पृ. ४७ ब) राजांनी रक्षण केले.
अ) द्विवचनाऐवजी अ. व. चा उपयोग केला जातो.
१) कंपति दो वि हत्था। (जिन पृ. ५१) दोन्ही हात कांपत आहेत २) दो वि गच्छति सोग्गइ। (दस. ५.१.१००) दोघही सद्गतीला जातात.
आ) उद्देश आदरार्थी अ. व. त. असताना क्रियापदही अ. व. त असते.
१) देव वीसत्था होह। (महा पृ. ३२ अ) महाराज ! स्वस्थ व्हा. २) तुब्भे नो मुणह देव किं एयं। (महा. पृ. १९८ ब) महाराज! हे तुम्हाला माहीत नाही काय?
क) उद्देश्य-क्रियापद-वचनसंवाद :
१) अनेक उद्देश्ये 'च' (इत्यादी) समुच्चयार्थक अव्ययाने जोडलेली असता क्रियापद अ. व. त. असते.
१) विजा मंता य सिझंति। (महा. पृ. १७२ ब) विद्या व मंत्र सिध्द होतात.
२) से पंडूराया कोंती य देवी पंच य पांडवा कच्छुल्लनारयं आढ़ति (नायासं पृ. १८४) तो पंडु राजा, राणी कुंती आणि पांच पांडव यांनी कच्छुल्ल नारदाचा आदर केला
१ च अध्याहृत असताही क्रियापद अ. व. त. असते. धम्मो अत्थो कामो
मोक्खो चत्तारि होति पुरसित्था। (धर्मो पृ. १७) धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. च अध्याहृत असतां क्रियापद ए. व. त. : विहवो जिणवर धम्मो रोगाभावो पिएण संजोगो। अंते समाहिमरणं पाविज्ज इ परमपुन्नेहि। (ना ७.१५७)