________________
प्रकरण २८,
संवादित्व
8888888888888888888888888888888888888888888888888888
४२८ संवादित्व
वाक्यात जेव्हां विकारी शब्दांचा उपयोग केला जातो. तेव्हा त्यांच्या परस्पर संबंधात विशिष्ट प्रकारचे संवादित्व (Agreement Concor) असणे आवश्यक असते. उदा. नाम जर ए. व. त. वापरले असेल तर त्याचे गुण विशेषणही ए. व. त. असणे आवश्यक आहे. कर्ता प्रथमपुरुषी असतांना क्रियापदही प्रथम पुरूषीच असणे जरूर आहे. इत्यादी अशा प्रकारच्या संवादित्वाचा आता विचार करावयाचा आहे.
विकारी शब्दांच्या संवादित्वाचा विचार करताना, लिंग, वचन, विभक्ती व पुरुष यांना अनुलक्षून विचार करावा लागतो.
संवादित्वाचा विचार पुढीलप्रमाणे तीन मुख्य विभाग पाडून केलेला आहे. अ) उद्देश्य-विधेय-संवाद १) उद्देश्य-क्रियापद संवाद २) उद्देश्य-विधिविशेषण संवाद (साधे- तसेच धातुसाधित विशेषण) ३) उद्देश्य संवाद विधिनाम आ) विशेषण-विशेष्य संवाद १) गुणविशेषण- विशेष्य संवाद २) संख्याविशेषणविशेष्य संवाद इ) नाम-सर्वनाम संवाद १) नाम-संबंधी सर्वनाम संवाद २) नाम व इतर सर्वनामे यांचा संवाद १ कधी हे संवादित्व पाळले न गेलेले आढळते. उदा. १) अहं पुण गिहत्थधम्मे
अभिरमामो। (पउम.३३.४८) २) स इमीए सह विसयसुहं अणुहविंसु। (समरा. पृ. ६००) ३) संपज्जलिया घोरा अग्गी चिट्ठइ गोयमा। (उत्त २३.५०) गोयमा, पेटलेले अग्नी आहेत. ४) अभू जिणा अस्थि जिणा अदुवा वि भविस्सई। (उत्त. २.४५)