________________
प्रकरण २७ : ल्यबन्त व तुमन्त यांचे उपयोग
५) सज्ज : सज्जो होहि जुज्झिउं । (वसु. पृ. २४२) युद्ध करण्यास सज्ज हो. ७) क्रियादर्शक कालवाचक शब्दाबरोबर तुमन्ताचा उपयोग केला जातो. १) कालो य मे... अत्थं उवज्जिउं । (समरा पृ. १९६) पैसा मिळविण्याचा (हा) माझा काल आहे. २) साहूणं विहरिउं कालो। (धर्मों पृ. ६८) साधूंचा हिंडण्याचा काळ
८) संस्कृतप्रमाणे 'काम' व 'मण' या शब्दाबरोबर समासांत पूर्वपदी तुमन्ताचा उपयोग होतो.
अ) १) परमपयं गंतुकामेहि । (सुपास ६४९) श्रेष्ठपदीं जाण्याची इच्छा करणाऱ्यांनी २) नियत्तिड कामो हं इयाणि । (महा. पृ. १७० अ) आत्ता माझी परत जाण्याची इच्छा आहे.
४५३
आ) १) दइयं दट्टुमणा देइ दाणं । (नल पृ. २२) प्रियकराला पाहू इच्छिणारी ती दान देऊ लागली. २) वेगेणं उसि उमणो पहाविओ । ( महा पृ. १७५ अ) चावण्याची इच्छा धरून वेगाने धावला.