________________
४५२
अर्धमागधी व्याकरण
रोग वाढू लागला.
४) प्रवृत्त होणे : १) वरिसिउं पयट्टो मेहो। (नल. पृ. १८) मेघ वर्जू लागला २) अह वाइड पवत्तो वाओ । (पउम. ४.१३) मग वारा वाहू लागला.
५) त्वरा करणे : अभितुर पारं गमित्तए (उत्त १०.३४) पार जाण्यास त्वरा कर.
६) लागणे : सो पुव्वभवं साहिउं लग्गो। (सुपास. ४९४) तो पूर्वजन्म सांगू लागाला.
७) असणे : जइ उत्तममग्गेण विहरिउं विज्जए इच्छा। (महा. पृ. १६९ अ) जर उत्तम मार्गाने जाण्याची इच्छा असेल.
८) योग्य असणे : १) तम्हा न जुज्जइ इह निवसिउं। (महा. पृ. ३१० अ) म्हणून येथे रहाणे योग्य नाही. २) न य दिटुं सुयं सव्वं भिक्खू अक्खाउमरिहइ। (दस. ८.२०) पाहिलेले वा ऐकलेले सर्व भिक्षूने सांगणे योग्य नाही.
९) शक्य असणे, समर्थ असणे : १) न सक्केमो ते मग्गं दंसिउं। (नल. पृ. २१) तुला मार्ग दाखविण्यास आम्ही समर्थ नाही. २) को सक्कइ मं मारेउं। (अगड. १४८) मला कोण मारु शकेल.
६) पुढील काही शब्दाबरोबरहि तुमन्ताचा उपयोग केला जातो. १) सेयं : सेयं पव्वइउं मम। (उत्त २२.२९) मी संन्यास घेणे चांगले
२) पकामं : नो संचाएमि सम्मं पकामं वियरित्तए । (पएसि परि १९) योग्य प्रकारे भरपूर हिंडणे मला शक्य होत नाही.
३) समर्थ, शक्त, प्रभु : १) तुब्भे समत्था उद्धतु परमप्पाणमेव य। (उत्त २५.३९) स्वतःचा व दुसऱ्याचा उद्धार करण्यास तुम्ही समर्थ आहात २) पंचाणणो न सक्को समीवदेस पि अक्कमिउं। (नल. पृ. १५) जवळ जाण्यास सिंह सुद्धा समर्थ झाला नाही. ३) पह कण्हे वासुदेवे गंगं महानइं बाहाहिं उत्तरित्तए उदाहु नो। (नामा,स १९५-१९६) गंगा महानदी बाहूंनी तरून जाण्यास कृष्ण वासुदेव समर्थ आहे की नाही?
४) युक्त : ता न जुत्तं मे इह अत्थिउं। (समरा. पृ. १३६)) तेव्हा मी येथे रहाणे रहाणे योग्य नाही.