________________
प्रकरण २७ : ल्यबन्त व तुमन्त यांचे उपयोग
४५१
४२७ तुमन्ताचे उपयोग
१) क्रियेचा हेतु, उद्देश, प्रयोजन दर्शविण्यास तुमन्ताचा उपयोग होतो.
१) जिमिउं उवविठ्ठो। (अरी. पृ. ७) जेवायला बसला २) सो वच्चउ तमाणे उं। (संपइ २.५८) त्याला आणण्यास तो जाऊ दे. ३) तुमं दुटुं आगओ हं। (नल. पृ. १९) तुला भेटण्यास (पहाण्यास) मी आलो आहे.
२) कधी तुमन्ताचा ल्यबन्ताप्रमाणे उपयोग केला जातो. १) सुणसु तुमं अवहिओ होउं। (सुपास. ४८८) एकचित्त होऊन तू ऐक.
२) को दटुं परलोगमागए। (सूय. १.२.३.१०) परलोक पाहून कोण (परत) आला आहे?
३) कर्मण्यर्थी : (कर्मणि प्रयोगांत तुमन्त तसेच रहाते)
१) न हि तक्करो रक्खि उं जुज्जइ। (नल. पृ. २२) चोराचे रक्षण करणे योग्य नाही २) न य सक्किया बोहिउं मए समणा। (सपइ. १.१०) स्वजनांना बोध करणे मला शक्य झाले नाही.
४) 'अलं' या अव्ययाला कधी तुमन्तांची अपेक्षा असते.
१) नालं तण्हं विणेत्तए। (दस. ५.१.७८) तृष्णा दूर करण्यास पुरेसे (समर्थ) नाही. २) तं दुटुं विसविगारं अवि हणिउं अलं। (महा. पृ. ३१७ ब) विषाच्या त्या दुष्ट परिणामाला सुद्धा नाहीसे करण्यास पुरेसे (समर्थ) आहे.
५) पुढील काही क्रियापदांना अर्थपूर्तीसाठी तुमन्ताची अपेक्षा असेत.
१) इच्छिणे : १) जइ गंगं महसि दटुं। (नल पृ. ३) जर गंगा (नदी) पहाण्याची इच्छा असेल २) नेच्छान्ति वंतयं भोत्तुं। (दम २.६) ओकलेले (पुनः खाण्याची इच्छा करीत नाहीत.
२) उत्सुक असणे : अन्नत्थ गंतुं न उच्छहइ मे मणं। (नल पृ. १४) दुसरीकडे जाण्यास माझे मन उत्सुक नाही.
३) सुरू करणे. : १) कहिड पारद्धो सूरिणा धम्मो। (महा. पृ. ७१ ब) सुरीने धर्म सांगण्यास सुरवात केली. २) रोगो वड्ढि उमारद्धो। (पाकमा. पृ. ४९)
१ कधी ‘अलाहि' या अव्ययाला तुमन्ताची अपेक्षा असते. पहिआ अलाहि
गंतुं। (कुमार ४.८) पथिका, जाऊ नको.