________________
४४८
अर्धमागधी व्याकरण
'असले पाहिजे' असा अर्थ होतो.
१) विज्जासु पुरिसेण असंतुट्टेण होयव्वं। (धर्मों. पृ. ४६) विद्येचे बाबतींत माणासने असंतुष्ट असले पाहिजे २) भवियंव्वं अणेण नरवइसुएणं। (समरा. पृ. ५४८) हा राजपुत्र असला पाहिजे.
७) भविष्यकाळ दर्शविण्यास वि. क. धा. वि. चा उपयोग होतो.
१) तुब्भेहिं कमि नयरंमि गतव्वं। (सुपास. ५०१) तुम्हाला कोणत्या नगरीला जायचे आहे। २) अज्ज मए एत्थेव वसियत्वं। (समरा पृ. ५३३) आज मी येथेच राहणार आहे. ____ अ) भविष्यकाळांतील निश्चितता दाखविण्यास वि. क. धा. वि. चा उपयोग होतो.
१) भुत्तव्वा तए नलेण सह भोगा । (नल. पृ. २०) तुला नलासह भोग भोगावयाचे आहेत. २) जाएण जीवलोएण मरियव्वं ताव। (सुपास. ५०१) जन्माला आलेल्या जीवांना मरायचे आहेच.
८) संकेतवाक्यांत वि. क. धा. वि. चा उपयोग होतो.
१) अह अवस्सं मारेयव्वा ता पढमं ममं मारेह। (धर्मों. पृ. ४०) जर (हिला) नक्कीच मारायचे असेल तर प्रथम मला मारा. २) जइ अवस्सं सोयव्वं ता गंतूण पुच्छह। (महा. पृ. १५७ अ) जर अवश्य ऐकायचे असेल तर (तुम्हीच) जाऊन विचारा.