________________
प्रकरण २७) ल्यबन्त व तुमन्त यांचे उपयोग
888888888888888888888888888888888888888888888888888888
४२६ ल्यबन्ताचे उपयोग
१) एक कर्तृक अनेक क्रिया एका मागोमाग असतांना, पूर्वक्रिया दर्शक धातूंचे ल्यबन्त वापरले जाते.
१) गंतूण पणमिऊण य भणइ। (पडम ३४.४) जाऊन व प्रणाम करून म्हणतो. २) खवित्तु कम्मं गइमुत्तमं गया। (दस. ९.२.२३) कर्माचा क्षम्मं करून उत्तम गतीला गेले.
२) काही ल्यबन्तांचा उपयोग क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केलेला आढळतो. पेच्च (परलोकी), पसज्झ (बलात्काराने), आरुस्स (रागाने), आहच्च (एकाएकी) इत्यादि.
३) काही ल्यबन्ताचा उपयोग शब्दयोगी अव्ययाप्रमाणे केलेला आढळतो.
उद्दिस्स (उद्देशून), पडुच्च (बद्दल, संबंधी इ.) मोत्तूण (खेरीज, विना) इत्यादि.
४) संस्कृतप्रमाणे अर्धमागधीतहि कधी ‘णमुल' चा उपयोग केला जातो.
१) अभग्गसेणं चोरसेणावई जीवग्गाहं गिण्हाहि। (विवाग. पृ. २५) अभग्गसेण चोरसेनापतीला जिवंत पकड २) अभग्गसेणं चोदसेणावई जीवग्गाहं गिण्हति।
१ क्वचित् भिन्नकर्तृक क्रिया दर्शविण्यास ल्यबन्ताचा उपयोग केलेला आढळतो.
सिद्धाण नमो किच्चा अत्थधम्मगइं सुणेह मे। (उत्त २०.१) सिद्धांना नमस्कार करून, अर्थ व धर्म यांची गति मी सांगतो. ते ऐका. क्वचित् समकालीन क्रिया दर्शविण्यास ल्यबन्ताचा उपयोग केलेला आढळतो. दारं अवलंबिया न चिट्ठज्जा। दस. ५.२.९) दाराला टेकून उभे राहू नये. (मराठीत : दाराला टेकून उभा रहातो)
२