________________
प्रकरण २६ : काही धातुसाधित विशेषणांचे उपयोग
४४७
२) वयाइयारो कायव्वो नेय बुध्दिमंतेहि । (सुपास ६३४) बुध्दिवंतांनी व्रतातिविचार करू नये.
आ) इतरत्र सर्वत्र भावे प्रयोग होतो.
१) तुम्हेहि वि जिणधम्मे जइयव्वं। (सुपास. ५६६) तुम्ही सुद्धां जिन धर्म आचरण्याचा प्रयत्न करावा २) तुमए कत्थ गंतव्वं। (सुपास ६१०) तुम्हाला कोठे जावयाचे आहे?
४) विध्यर्थाने दर्शविले जाणारे सर्व अर्थ दाखविण्यास वि. क. धा. वि. चा उपयोग होतो.
१) आवश्यकता : १) साहेयव्वा नरेण पुरिसत्था। (अरी पृ. ६) माणसाने पुरुषार्थ साधावे, २) एसो खुमज्झ वइरी विणासियव्वो मएऽवस्सं। (महा. पृ. ८० अ) हा खरोखर माझा वैरी आहे. त्याचा नाश मला अवश्य केला पाहिजे.
२) कर्तव्य : मुणिणा सच्चं भणेयव्वं। (सुपास. ६०८) मुनीने सत्य बोलावे.
३) विनंति : १) न रूसियव्वं बुहजणेणं । (पडम. १.११) शहाण्यांनी रागावू नये. २) तेसि वयणं न सोयव्वं। (धर्मों. पृ. १५५) त्यांचे वचन ऐकू नये.
४) विनयपूर्वक प्रश्न : किमेत्थ कायव्वं। (चउ पृ. ३१) आतां या बाबतीत काय करावे?
५) नम्र आज्ञा : १) तुम्हेहिं तत्थ मोणेण ठायव्वं। (संप ३.२.९) तुम्ही तेथे मौन धरून रहावे. २) न हु एयं भोत्तव्वं एएण सगाणियं भत्तं। (अगड. २२२) याने आणलेले अन्न मुळीच खाऊ नये.
६) प्रार्थना : खमियव्वं तुमए दुच्चिट्ठियं इमं। (चउ पृ. ४५) या वाईट कृत्याला आपण क्षमा करावी.
७) उपदेश : दमियव्वो साहुणा णिओ देहो। (धर्मों. पृ. ५३) साधूने आपल्या देहाचे दमन करावे.
५) काय असावे काय करावे, हे दर्शविण्यासहि वि. क. धा. वि.चा उपयोग
होतो.
१) भासियव्वं हियं सच्चं । (उत्त १९.२६) हितकर सत्य बोलावे. २) पयंपियव्वं न दुव्वयणं। (सुपास. ५५२) दुर्वचन बोलू नये.
६) भावे प्रयोगांत ‘भवियव्व' वा 'होयव्व' यांचा उपयोग असता (प्रायः)