________________
४४६
अर्धमागधी व्याकरण
करतांना या विशेषणांचा उपयोग होईल. त्यावेळी तृतीयान्त कर्ता प्रथमेत, प्रथमान्त कर्म द्वितीयेंत व प्रथमान्त कर्त्यांच्या लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे कर्तरि भूत धा. वि. चे लिंग, वचन, विभक्तिप्रमाणे कर्तरि भूत धा. वि. चे लिंग, वचन, विभक्ति होते. उदा.
१) लज्जा मए चत्ता। (जिन. पृ. २५) - लजं अहं चत्तवंतो। २) देवीए पेसियाई फलाइं । (सुपास. ५१८) - देवी पेसियवंती फलाइं। ३) अम्हेहिं सुया निवस्स कित्ती । (सिरि. १२८) - अम्हे सुयवंता निवस्स
कित्ती।
४) सा वग्घेण हया। (सुवास ५९५) - तं वग्घो हयवंतो।
४२५ वि. क. धा. वि. चे उपयोग
१) वि. क. धा. वि. चा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो. बहुपुन्नपावणिजो मणी। (सुर ९.१४२) पुष्कळ पुण्याने प्राप्य असा मणी २) वि. क. धा.वि. चा उपयोग नामाप्रमाणे होतो.
१) सुणह सोयव्वाइं। (समरा. पृ. १) ऐकण्यास योग्य गोष्टी ऐका. २) अखमो समहिग भासियव्वे वि। (महा. पृ. १४८ ब) अधिक बोलण्यास सुद्धा असमर्थ ३) जेण रूसियव्वं जुत्तं। (कथा पृ. ११५) ज्यामुळे रागावणे योग्य आहे.
३) क्रियापदाप्रमाणे विध्यर्थाचे अर्थी वि. क. धा. वि. चा उपयोग होतो.
अ) वाक्यांत सकर्मक क्रियापदाचे कर्म उक्त असतां, वि. क. धा. वि. चा उपयोग करताना कर्मणि प्रयोग होतो. कर्तृपद तृतीयेत जाते. कर्म प्रथमेत येते व वि. क. धा. वि. हे प्रथमान्त कर्माच्या लिंग, वचन विभक्तीप्रमाणे असते.
१) सीलं रक्खियव्वं मए । (चउ पृ. ३१) मला शीलाचे रक्षण केले पाहिजे
१
अ) विशेषणाप्रमाणे समासांत : असं भावणी दंसणं (बंभ पृ. ५५), माण णेज्जजणं (सुर १.२३७)
आ) विशेषणाप्रमाणे पूरक : माया इव वंदणिज्जासि। (नाण ७.६०) मातेप्रमाणे वंदनीय आहेस.