________________
४४४
अर्धमागधी व्याकरण
४) बोलीणाई बहूई वरिसाइं। (महा. पृ. १२ ब) पुष्कळ वर्षे निघून गेली.
२) क. भू. धा. वि. बरोबर अस् [ वा भू (भवा हव ] चा उपयोग असतां पूर्ण भूतकाळ निर्दिष्ट होतो.
१) आगओ आसि अहं। (चउ पृ. ३१) मी आलो आहे. २) जं तए पुच्छियं पुरा आसि। (महा पृ. ८६ ब ) जे तू मागे विचारले होतेस.३) क. भू. धा. वि. बरोबर 'चिट्ठ' (स्था) च्या उपयोगाने क्रियासातत्य निर्दिष्ट होते.
१) मउरा य पंजरंसि संनिरुध्दा चिटुंति। (विवाग पृ. ४६) आणि पिंजऱ्यात मोर अडकवून ठेवलेले आहेत. २) सो ... आगओ दुवारंमि चिट्ठइ। (सुर २.१०८) तो दारांत येऊन उभा राहिला आहे.
४) कधी ‘अस्' च्या व का. धा. वि. बरोबर क. भू. धा. वि. चा उपयोग केला जातो.
१) कह कह वि पट्टविया संती। (धर्मों पृ. ४८) कशीतरी पाठविली असता. २) मओ समाणो। (धर्मो पृ. ८१) मृत झाला असता.
५) कधी क. भू. धा. वि. ने भविष्यकाळ' निर्दिष्ट होतो.
१) एसो अहं आगओ। (समरा पृ. ३८१) हा मी आलो (येईन) २) एसो हं आगओ सिग्घं। (नाण ४.७२) हा मी शीघ्र आलोच (येईन)
६) मन्न (मन्) व तदर्थक धातूंच्या क. भू. धा. वि. चा उपयोग२ वर्तमानार्थी होतो. बहुमओ नरवइस्स। (महा पृ. १७८ ब) राजाला फार मान्य.
७) क. भू. धा. वि. चा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो.
१) एवं भुत्ताण भोगाणं परिणामो न सुंदरो। (उत्र १९.१७) अशाप्रकारे भोगलेल्या भोगांचा परिणाम चांगला होत नाही. २) वग्यो दिट्ठो मए सुत्तो। (सुपास ५९३) झोपलेला वाघ मी पाहिला ३) जायस्स जंतुणो धुवो मच्चु। (नल पृ. १७) जन्माला आलेल्या जंतूचा मृत्यु निश्चित आहे.
८) क. भू. धा. वि. चा उपयोग नामाप्रमाणे होतो.
१ ३ ४
म. हा मी आलोच (येई) २) आपटे, पृ. १०५ समासांत : कुवियमणो (संपइ २.१३), भत्तितुट्टेण (बंभ पृ. ६४) इत्यादि समासांत : जिणवरकहियं (पउम ४.३१) सुभासिय (पउम ३३.३५) इ.