________________
प्रकरण २६ : काही धातुसाधित विशेषणांचे उपयोग
४४३
४२३ क. भू. धा. वि. चे उपयोग
१) (क्रियापदाऐवजी) भूतकाळ दर्शविण्यास : अ) सकर्मक क्रियापदाच्या क. भू. धा. वि. चा उपयोग करताना (कर्म उक्त असल्यास) कर्मणि प्रयोग होतो.
कर्तृपद तृतीयेत जाते, कर्म प्रथमेत येते आणि या प्रथमान्त कर्माच्या लिंग, वचन विभक्ती प्रमाणे क. भू. धा. वि. चे लिंग, वचन विभक्ति असते.
१) को इत्थीहिं न खहिओ। (धूर्ता १.६२) स्त्रियांनी कुणाला क्षुब्ध केलेले नाही? २) दिट्ठा निवेण सा बाला। (सिरि ८२) राजाने ती बाला पाहिली. ३) पवणेण वत्थाई हियाइं सव्वाइं। (धूर्ता ५.४६) वाऱ्याने सर्व वस्त्रे हरण केली.
आ) वाऱ्यांत सकर्मक क्रियापदाचे पुढील वाक्य हे कर्म असेल तर क. भू. धा. वि. चा उपयोग करताना भावे प्रयोग होतो. कर्तृपद तृतीयेत जाते व क. भू. धा. वि. हे नेहमी नपुं. द्वि. ए. व. त असते.
१) गुरुणा वत्तं-सुण। (नल पृ. १) गुरूने म्हटले ‘ऐक' २) चिंतियं राइणा उत्तम पुरिसो एसो। (अगड पृ. २९) राजाने विचार केला हा उत्तम पुरूष आहे.
इ) गत्यर्थक व अकर्मक धातूंच्या क. भू. धा. वि. चा उपयोग कर्तरि होतो. कर्तृपद प्रथमेंत व कर्त्याच्या लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे क. भू.धा. वि. चे लिंग, वचन, विभक्ति असते.
१) निसण्णो राया (चउ पृ. १९) राजा बसला २) संतत्था लोया। (नल. पृ. १६) लोक संत्रस्त झाले ३) पणटुं तिमिरं। (धर्मो पृ. ३०) तिमिर नष्ट झाले
१
w
प्रयोगविचार पहा कधी कर्मणि प्रयोगाऐवजी कर्तरि प्रयोगच आढळतो. १) भुत्तो दिव्वाहारं सभारिओ राया। (चउ पृ ४६) २) राया ... एयं भणिउं आढन्तो । (अगड ७) ३) सीहोयरो पउत्तो। (पउम ३३.१४०) तेव्हा लक्ष्मण म्हणाला अशा वेळी कधी भावे प्रयोग वापरलेला आढळतो. १) वियसिग लोयणेहिं। पणटुं पावेणं। ऊससियं अंगेहि। (समरा पृ. ८३) २) गजिम मेहेहि। (समरा पृ. ३७०) ३) रोइयं नगरनारीहिं। (नल पृ. ११) नगरांतील स्त्रिया रडल्या ४) हसियं राइणा। (धर्मो पृ. २०४) ५) चलिं महचित्तेणं। (नल पृ. २३) ६) मए चिरं रूण्णं । (लीला ६४३) मी बराच वेळ रडले.