________________
४४२
अर्धमागधी व्याकरण
उट्ठिओ भीमो । (महा. २. २५७) मी मंत्रसाधन करीत असतां एक भयंकर महापिशाच आचनक उठले.
आ) सति सप्तमी : मइ विज्जमाणे मा उव्वेव - भायणं होसु । (जिन पृ. १०) मी असताना उव्देग करू नकोस.
९) संबंधी गौणवाक्य१ व. का. धा. वि. च्या उपयोगाने संक्षिप्त करता येते. १) जग्गंतस्स भयं नत्थि । (नल पृ. ५०) जागणाऱ्याला भय असत नाही. २) अहम्मं कुणमाणस्स अफला जंति राइओ । धम्मं च कुणमाणस्स सफला जति राइओ। ( उत्त १४.२४ - २५) अधर्म करणाऱ्याच्या रात्री निष्फळ होतात; धर्म करणाऱ्याच्या रात्री सफळ होतात.
१०) क्वचित् व का. धि. वि. चा उपयोग प्रत्यक्ष क्रियापदाऐवजी ' केलेला आढळतो. उदा. मा हौं परेहिं दम्मंतो । (उत्र १.१६) मी दुसऱ्याकडून दमन केला जाऊ देऊ नको २) मम ताओ कहं जीवंतो । (धर्मो पृ. १५९) माझा बाप कसा जगत होता? ३) सो सव्वो तुह गुणनिवहं मह कहिंतो । (सुर ११.१४८) ते सर्व तुझ्या गुणगणाबद्दल मला सांगीत.
४२२ कर्मणि व. का. धा. वि. चे उपयोग
१) कर्मणि व. का. धा. वि. चा. विशेषणाप्रमाणे उपयोग होतो. १) ते डज्झमाणा कलुणं थणंति । (सूय १.५.१.७) जाळले जाणारे ते करूणपणे ओरडतात. २) काले च्चिय कीरंतो ववसाओ कज्जसाहगो होइ । (महा. पृ. २८८ ब) (योग्य) वेळी केला जाणारा व्यवसायच कार्यसाधक होतो. २) सत्सप्तमी रचनेत कर्मणि व का. धा. वि. चा उपयोग होतो.
१) मिहिलाए डज्झमाणीए न मे डज्झइ किंचण । (उत्र ९.१४) मिथिला जाळली जात असता माझे काहीहि जाळले जात नाही. २) एवं पि कीरमाणे कयावि गुणो होज्जा। (महा पृ. १२९ ब) असे केले असतां कदाचित् गुण येईल.
१ घाटगे पृ. २०९
समासांत : छिज्जमाणहियओ (नल पृ. ४१) दूमिज्जमाण माणसेण (कथा पृ. १०७) इ.