________________
प्रकरण २५ : काळ व अर्थ यांचे उपयोग
४३९
आढळतो.
१) मा णं तुब्भे दक्खिणिल्लं वणसंडं गच्छेजाह (नामासं पृ. १२५) दक्षिणेकडील वनाच्या वृक्षराजीत तुम्ही जाऊ नका २) मा पुण एवं करेज्जासु । (महा पृ. २९९ ब) पुनः असे करू नकोस ।
४१९ संकेतार्थाचे उपयोग
'जर-तर' हा अर्थ दाखविण्यास संकेतार्थाचा उपयोग होतो. गरूआवईए तं नाह निवडतो ।। (सुर ८.१७) जर तेव्हा मी प्राणत्याग केला असतां तर, हे नाथ! तू आतां असल्या महासंकटांत पड़ला. असतास काय? २) जइ एस विज्जासिद्धो मम भइणी चंदकंताए न बंभचेर भंग करेंतो ता इमीए सयंपभा नाम महाविज्जा साहिया हुंता। (महा पृ. १६४ अ) जर या विद्यासिद्धाने माझ्या बहिणीचा - चंदकांतेचा-ब्रह्मचर्यभंग केला नसता तर तिने सयंपभा नावाची महाविद्या साधली असती.