________________
४३८
अर्धमागधी व्याकरण
६) शंका, संशय : १) किमेयं मंगलगेण ववसियं भवे । (समरा पृ. १४७) हे मंगलगाणे केले असेल काय ? २) को अहं दिज्ज भत्तं । ( धूर्ता १.११) आम्हाला कोण अन्न देईल ?
७) एकवेळ अशक्य गोष्ट शक्य होईल, असे गृहीत विधान सांगतानाहि विध्यर्थाचा उपयोग केला जातो.
१) सुवण्णरूप्पस्स उ पव्वया भवे । ( उत्र ९८४८) सोन्या रूप्याचे पर्वत होतील. २) होज्जा खीरं पि गोविसाणाओ । (समरा पृ. ४००) गाईच्या शिंगातूनही दूध मिळेल.
४) परस्परावलंबी वाक्यांतील परिणामदर्शक वाक्य कधी विध्यर्थांत ठेवले '
जाते.
किं नाम होज्ज तं कम्मयं जेणाहं न दोग्गइं गच्छेज्जा । ( उत्त ८. १) ते काय बरे कर्म असेल की ज्यामुळे मी दुर्गतीला जाणार नाही ?
५) संकेतवाक्यांत विध्यर्थाचा उपयोग केला जातो.
१) जइ अरिट्ठणेमी ... नंदणवणे विहरेज्जा तएणं अहं अरिट्ठणे मि वदिज्जा । (निरया पृ. ७३) जर अरिष्टनेमी नंदनवनात विहार करील तर ( नंतर) मी त्याला वंदन करीन. २) को व ण लभेज्ज मोक्खं रागद्दोसा जइ न होज्जा । (वसु पृ. ३२२) रागद्वेष। जर नसते तर कुणाला बरे मोक्ष मिळाला नसता ?
६) क. भू. धा. वि. बरोबर विध्यर्थाचा उपयोग केलेला आढळतो.
१) सट्ठाणं गओ होज्जा। (महा पृ. २३० अ) स्वस्थानी गेला असेल २) केण पुण होज्ज छिण्णा एस रज्जू । (जिन पृ. २७) ही रज्जू कोणी बरे तोडली असेल ?
७) कधी विध्यर्थाचा उपयोग भविष्यकाळार्थी होतो.
१) नो खलु अहं सागरदत्तस्स गिहं गच्छेज्जा । ( नामास पृ. १७१) मुळीच सागरदत्ताच्या घरी जाणार नाही. २) न हविज्ज धम्मबुद्धी मूढस्स उ लोभमोहेणं । (पउम. २.७८) लोभ-मोहामुळे मूढाला धर्मबुद्धी होणार नाही.
८) निषेध दर्शविण्यास पुष्कळदा 'मा' बरोबर विध्यर्थाचा उपयोग केलेला
आपटे पृ. १३६
१