________________
प्रकरण २५ : काळ व अर्थ यांचे उपयोग
४३७
ठेवावीस (,) नियजणणिं च सरिज्जसु ... मं. पि नियदासिं । (सिरि ३५७) आपल्या आईची व माझी आपल्या दासीची - हि आठवण ठेवावीस.
४) इच्छा : अन्नजम्मंमि वि महं तुमं चेव नाहो होजसु। (पाकमा पृ. ५९) दुसऱ्या जन्मातहि तूच माझा नाथ (पति) व्हावेस.
५) आशिर्वाद : भद्दस्स वो भत्तिगुणल्लिआणं भवेज णिच्चं भअवं गणेसो। (उसा १.१) भक्तिगुणलिलिआणं भवेज णिच्चं भअवं गणेसो । (उसा १.१) भक्तिगुणांनी युक्त अशा तुमचे भगवान गणेश नेहमी चांगले करो।
६) विनंति : तुब्भे पएसिस्स रन्नो धम्ममाइक्खेज्जाह। (पएसि परि १८) तुम्ही पएसि राजाला धर्म सांगावात.
२) कर्तृरहित विध्यर्थाचा उपयोग प्रायः विधि, नियम दर्शविण्यास केला जातो. उदा. नापुट्ठो वागरे किंचि पुट्ठो वा नालियं वए। (उत्र १.१४) विचारले नसतां बोलू नये, विचारले असतां खोटे बोलू नये.
३) शक्यता, शक्तता, संभवात, अशक्यता, असंभवना, शंका, संशय इत्यादींचाही बोध विध्यर्थाने होतो.
१) शक्यता : १) एवंविह रूवेणं हविज एसो फुडं चोरो। (अगड १०४) अशा रूपांत हा चोर असण्याची स्पष्ट शक्यता आहे. २) गामाणुगाम रीयंत अणगारं... अरई अणुप्पवेसेज्जा। (उत्तर २.१४) गावोगांव हिंडणाऱ्या अणगाराच्या ठिकाणी नावड प्रवेश करील.
२) संभरता : १) नूणं होज विलुक्को कत्थइ परिहासकज्जेण। (जिन पृ. १५) गंमत करण्यास कोठे तरी दडला असेल. २) एयंमि घेप्पमाणे कयाइ नरवई अवगच्छे। (समरा पृ. १५२) हे घेतले असता कदाचित् राजाला कळेल.
३) शक्तता : लोग पि एसो कुविओ डहेजा। (उत्त १२.२८) रागावला तर हा जगसुध्दा जाळील.
४) अशक्यता : ता कि ससिबिंबाओ अंगाराण पि होज इह वुट्ठी। (सुपास ६००) चंद्रबिंबातून अंगारांची वृष्टी होईल काय?
५) असंभवता : १) किंकरनारीण को तस्स करेज परिसंखा। (पउम. ४.६०) त्याच्या सेवक-सेविकांची मोजदाद कोण करेल? २) को किर मच्चूए रक्खिजा। (सुपास ६४०) मृत्यूपासून कोण रक्षील?