________________
४३६
अर्धमागधी व्याकरण
२) 'मा' बरोबर आज्ञार्थाचा उपयोग असतां निषेध दर्शविला जातो.
अ) प्र. पु. : मा कुले गंधणा होमो। (दस २.८) कुळांत गंधण (सापा) प्रमाणे आपण होऊ या नको.
आ) द्वि. पु. : १) मा लज्ज मुद्धे ! (उसा १.२१) मुग्धे, लाजू नकोस २० मा एऐण पहेण वच्चह । (महा पृ. १५९ ) या मार्गाने जाऊ नका.
इ) तृ. पु. : १) मा होउ सुयमरण। (पाइ पृ. ६१) मुलाचा मृत्यू होऊ दे नको. २) मा वहउ कोइ गव्वं। (सिरि ३२९) कोणीहि गर्व करू दे नको.
टीप : क्वचित् ‘मा' ऐवजी 'अलाहि' चा उपयोग आढळतो अलाहि चा उपयोग आढळतो. अलाहि जूरावसु तवस्सिं। (मार्क ८.३) तपस्व्याला ठकवू नकोस.
३) कधी कधी संकेत वाक्यांतहि आज्ञार्थाचा उपयोग केलेला आढळतो.
१) सुणसु जइ अत्थि कोऊहलं। (महा. पृ. २३ ब) जर कुतूहल असेल तर ऐक.
२) एयं सरणं उवेह ... जइ इच्छह जीवियं वा धणं वा। (उत्र १२.२८) जर जिविताची वाधवाची इच्छा असेल तर मला शरण या.
४१८ विध्यर्थाचे उपयोग :
१) विधि (कर्तव्य, आज्ञा), विनयपूर्वक आज्ञा, प्रार्थना, इच्छा, आशिर्वाद, विनंति इत्यादींचा बोध विध्यर्थाने होतो.
२) विधि (आज्ञा, कर्तव्य): १) मुसं परिहरे भिक्खू। (उत्र १.२४) भिक्षूने खोटे टाळावे. २) नाणी नो परिदेवए। (उत्र २.१३) ज्ञान्याने शोक करू नये.
२) नम्र आज्ञा : १) तुमं पुण एयस्स सोहणं परिरक्खणं करेजासि। (अरी पृ. ५) तू मात्र याचे चांगले रक्षण कर २) अणाहओ य मा पयमवि चलेज्जासि। (महा पृ. ७५ ब) बोलावले नसता एक पाऊलहि हलू नकोस.
३) प्रार्थना १) सुमरिज्जासि मं। (महा पृ. १७० ब) माझी आठवण
१
संदर्भानुरूप विध्यर्थाचे अर्थ काही ठिकाणी आज्ञार्थाप्रमाणे होतात.