________________
प्रकरण २५ : काळ व अर्थ यांचे उपयोग
४३५
इ) तृतीय' पुरूषांत विनयपूर्वक आज्ञा, अनुज्ञा, विनंति, आशिर्वाद, आशा, प्रार्थना इत्यादींचा बोध होतो.
१) आज्ञा : १) जक्खो मम अंगरक्खओ होउ । (सुपास ४९३) यक्ष माझा अंगरक्षक होऊ दे २) जो विज्जा बलेण गंतुं समत्थो सो वच्च । ( धर्मों पृ. १७३) जो विद्याबलाने जाण्यास समर्थ आहे तो जाऊ दे.
२) अनुज्ञा : दोसग्गहणेण खलो जइ तूसइ तू उ वराओ । (जिन१) दोष काढून जर खल संतुष्ट होत असेल तर होऊ दे बिचारा ।
३) विनंति : १) संदिसंतु णं देवाणुप्पिया किं आगमणप्प ओयणं । (विवाग पृ. ५३) महाराजांनी आगमनाचे प्रयोजन काय ते सांगावे २) निउणबुध्दीए परिचिंतउ सामी। (महा पृ. २३६ ब ) निपुणबुध्दीने स्वामी विचार करू दे.
४) प्रार्थना : १) सिद्धा सिद्धी मम दिसंतु । (सामा पृ. १३) मला सिद्धांनी सिद्दी द्यावी. २) तित्थयरा मे पसीयंतु । (सामा पृ. १३) तीर्थंकर माझ्यावर प्रसन्न होवोत.
५) आशिर्वाद : १) दिसउ जिणसुपासो मंगलं वो सया सो। (सुपास ६५७) तो सुपास जिन तुम्हाला सदा मंगल देवो. २) रक्खंतु वो सेसस्स फणमणिभअहा। (लीला ५) शेषाच्या फणीचे मणिकिरण तुमचे रक्षण करोत.
६) इच्छा : एयं सच्चं तुह भासियं होउ । ( सुपास ५३५) हे तुझे बोलणे खरे होऊ दे.
७) (शक्यता, संशय) इत्यादि इतर १) रमउ थोवदिवसे । (जिन १० ) थोडे दिवस रमूंदे २) एवं होउ । ( संपइ २.७२ ) असे होऊ दे.
३) होऊ कोवि। (जिन ३२) कोणीही असू दे
४) वच्छे! तुज्झ वरो केरिसो होउ । (सिरि ८२) मुली !, तुझा पति कसला असू दे ?
१ धातूच्या कर्मणि रूपाचा आज्ञार्थांत तृ. पु. त उपयोग असतां तो एक उपचार होतो. उदा. अओ पढमं दूयपेसणेण से मुणिज्ज उमणं। पच्छाजहाजुत्रं किज्जउ। (नल पृ. ७-८ ) ; कीरड अम्हाणं समीहिय। (बंभ पृ. ७२) पसाओ कीरड आसणगहणेण । (बंभ पृ. ६९)