________________
प्रकरण २६) काही धातुसाधित विशेषणांचे उपयोग
888888888888888888888888888888888888888888888888888888
४२० प्रारंभिक
येथे सर्वच धातुसाधित विशेषणांच्या उपयोगांचा विचार केलेला नाही. धातू विशेषणांतील मुख्य म्हणजे कर्तरि व कर्मणि व का. धा. वि., कर्तरि भूत. धा. वि. व क. भू. धा. वि. आणि वि. क. धा. वि. यांच्या उपयोगांचा विचार पुढे क्रमाने केला आहे.
४२१ कर्तरि व. का. धा. वि. चे उपयोग
१) एक मुख्य क्रिया कर्ता करीत असतां, तो जर त्याचवेळी दुसरी गौण क्रियाहि करीत असेल, तर ती गौण क्रिया कर्तरि व का. धा. वि. ने. निर्दिष्ट होते.
१) उढिओ वियंभमाणो। (बंभ. पृ. ६६) जांभई देत उठला २) हसंतो नाभिगच्छेज्जा। (दस. ५.१.१४) हसत जाऊ नये. ३) गजंतो उढिओ केसरी। (महा. पृ. ४८ अ) गर्जना करीत सिंह उठला ४) वेवमाणी निसीमई। (उत्त २२.३५) कांपत (खाली) बसली.
२) सवय, रीत स्वभाव, स्थिती दर्शविण्यास व का. धा. वि. चा उपयोग होतो.
१) दुक्खाणी अणुहवंता अणंतकालं परिभमंति। (पउम ४.२८) दुःखे
अर्धमागधीत क्रियापद व त्यांचेच व का.। धा. वि. यांचा एकदम उपयोग केलेला आढळतो. अडमाणे अडइ। (विवाह १९१), फुसमाणे फुसइ (विवाह ३५४), हणमाणे हणइ (विवाह ८४९), पेइह पेहमाणे (पण्णवणा ४३५), सुणमाणे सुणेइ (आचारंग १.१.५.३) (पिशेल पृ. ३८२-३८३)