________________
४३२
भूतकाळाचे' उपयोग पुढीलप्रमाणे :
:
अर्धमागधी व्याकरण
१) भूतकालीन क्रिया दर्शविण्यास भूतकाळाचा उपयोग होतो.
१) अहं एयं अकासि। (सूय २.१.१२) मी हे केले २) से पुरिसे एवं वयासी। (सूय २.१.२) तो पुरूष असे म्हणला. ३) तत्थ आसी पिया मज्झ। (उत्र २०१८) तेथे माझा पिता होता ४) अहोत्था विउलो डाहो । ( उत्र २०.१९) फार दाह झाला. ५) इमाइ वयणाइ मुदा हरित्था । ( उत्र १२.८ ) ही वचने बोलला.
२) कधी भविष्यकाळार्थी भूतकाळाचा उपयोग होतो.
१) तं किं णं देवाणुप्पिया विउलं असणं ४ पुप्फवत्थमल्लालंकारं ते इहं हव्वमाणिज्जड उदाह सयमेव गच्छित्था। (विवाग पृ. २७) तेव्हा हे भल्या माणसा!, विपुल अन्न ( वगैरे, तसेच ) फुले, वस्त्रे, माळा, अलंकार तुझ्यासाठी लवकर इकडे आणले जाऊ देत की ( तूंच तिकडे) स्वतः जाशील?
२) अहं पि दूय आगओ एसो । ( नल पृ. ८) दूता !, हा मी सुध्दा आलोच ( येईन)
३) 'मा' या निषेधदर्शकाबरोबर उपयोग असतां भूतकाळाचा अर्थ आज्ञार्थी होतो. उदा. १) मा य चंडालियं कासि । ( उत्त १.१०) दुष्ट कृत्य करू नकोस २) मा काासि कम्माई महालयाई । (उत्र १३.२६) वाईट ( भयंकर) कर्में करू नकोस. ४) संकेतात संकेताचा परिणाम दर्शविण्यास कधी भूतकाळाचा उपयोग केलेला आढळतो.
दगस्स फासेण सिया या सिद्धी सिज्झिंसु पापा बहवे दगंसि। (सूय १.७.१४) उदकाच्या स्पर्शाने जर सिद्धी ( प्राप्त होणार असेल) तर पाण्यांतील पुष्कळ प्राण्यांना सिद्धि प्राप्त झाली असती.
१ क्वचित् वर्तमानकालार्थी भूतकाळाचा उपयोग आढळतो. १) इच्चाहंसु पुढो जणा। (सूय १.३.१.६.) सामान्य जन असे म्हणतात. २) एस मए तुज्झ अप्पिओ अप्पा । (नल पृ. १७) हा मी माझा देह तुला अर्पण करते. म. तुम्ही पुढे व्हा. हा मी आलोच (येईन)
२