________________
प्रकरण २५ : काळ व अर्थ यांचे उपयोग
४१६ भविष्यकाळाचे उपयोग
१) भविष्यकालीन क्रिया दर्शविण्यास भविष्यकाळाचा उपयोग होतो. १) को करिस्सइ उज्जयं । (उत्र २३.७५) प्रकाश कोण करील ? २) समणो होहामि तुह अणुन्नाए । ( सुमास ५८९) तुझी आज्ञा (अनुज्ञा ) घेऊन मी श्रमण होईन.
२) कधी संशय, अनिश्चितता दर्शविण्यास भविष्यकाळाच उपयोग करतात किं नाम काहामि सुएण भंते । (उत्र १७ . २ ) महाराज विद्वत्तेने मी काय करूं ?
३ ) विनयाने आज्ञा, अनुज्ञा, उपदेश करतांना भविष्यकाळाचा उपयोग होतो. १) मं तुमं खाहिसि सुहेण । (नल पृ. १७) तू मला सुखाने खा. २) पच्छा धम्मं चरिस्ससि। (उत्र १९.४३) नंतर धर्म आचरण कर. ३) पच्छा अगाराओ अणगारियं पव्वइस्सासि। (नायासं पृ. २६) मग घर सोडून संन्यास घे.
४) क. भू. धा. वि. बरोबर भविष्यकालीन क्रियापदाचा उपयोग केलेला आढळतो.
४३३
१) अहवा पहाए मह, वयण सुध्दि सलिलाणयत्थं कत्थ विजलासए गओ भविस्सइ पिययमो। (नल पृ. १४) अथवा पहाटे मला तोंड धुण्यासाठी पाणी आणण्यास कोठेतरी सरोवरावर (माझा ) प्रियतम गेला असेल २) एएहिं चोरे हिं निहयचेमणा कमा भविस्संति। (महा पृ. २४ अ) ह्या चोरांनो (त्यांना) बेशुध्द केले असेल.
५) 'मा' या निषेधदर्शकाबरोबर आज्ञार्थाचे अर्थी भविष्यकाळाचा पुष्कळदा उपयोग केलेला आढळतो.
१) मा. भमिहिसि घोरे संसार सागरे । ( उत्त २५.४०) घोर संसार सागरांत भ्रमण करू नकोस २) मा हु तुब्भं सरीरस्स वावत्ती भविस्सइ । (पृ. १२१) तुमच्या शरीराचा नाश होऊ दे नको. ३) एयंमि मा पमायं काहिसि (महा. १.९२) या बाबतीत प्रमाद करूं नकोस.
६) संकेताच्या दोन्ही वाक्यांत भविष्यकाळाचा उपयोग होतो.
१
घाटगे,
पृ. २०५