________________
प्रकरण २५ : काळ व अर्थ यांचे उपयोग
४३१
ई) संकेत वाक्यांत वर्तमानकाळाचा अर्थ भविष्यार्थी होतो.
१) जइ मम जं मग्गियं देह तो अहमवि मउडं देमि। (चउ पृ. २५) मी जे मागीन ते जर द्याल तर मी सुद्धा मुकुट देईन २) जइ तुमं पितत्थ वच्चासि ता पावेसि कणगदक्खिणं। (महा पृ. १६०ब) तू सुद्धा जर तेथे जाशील तर तुला सुवर्णदक्षिणा मिळेल.
५) कधी आज्ञार्थाने दाखविली जाणारी इच्छा दर्शविण्यास वर्तमानकाळाचा उपयोग होतो.
१) सा जयई सरस्सई देवी। (सुर १.१५) ती सरस्वती देवी विजयी असो। २) जयइ जयपसिध्दो वध्दमाणो जिणिंदो। (महा पृ. ३४०ब) जगप्रसिध्द जिनेंद्र वर्धमान विजयी असो।
६) निषेध दर्शविण्यास कधी 'मा' शी वर्तमानकाळाचा उपयोग केला जातो. मा भायसि। (वसु पृ. २२१) भिऊ नकोस.
७) वर्तमानकाळाचा असंबंधित (paranthetical) उपयोग होतो.
१) तिलोक्कमि वि मन्ने एरिसरूवा न इत्थिया अत्थि। (सुर १.९२) मला वाटते - त्रैलोक्यांत सुद्धा अशा रूपाची स्त्री नाही. २) मे मन्ने पुव्वभवे दिट्ठपुव्वो त्रि। (सुपास ५७२) मला वाटते (याला) मी पूर्वजन्मापूर्वी पाहिले होते.
४१५ भूतकाळाचे उपयोग
१) संस्कृतमधील तीन भूतकाळांपैकी अद्यतन भूतांतून (Arrist) अर्धमागधींतील भूतकाळ उद्भूत झालेला आहे. अनद्यतन व परोक्ष या प्रकारांची अगदी तुरळक रूपे अर्धमागधीत आढळतात.
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धातूंच्या भूतकालीन रूपांचा उपयोग अर्धमागधींत फार कमी प्रमाणांत आहे. वर्तमानकाळ व क. भू. धा. वि. यांच्या योगेंच भूतकाळाचे बहुतेक कार्य केले जाते.
१ २
आपटे, पृ. १२९ घाटगे, पृ. २०४ पहा