________________
४२८
म्हणताच श्रेष्ठ गणधाराने खरा अर्थ सांगितला २) कुमारे दिट्ठमेत्ते चेव तीए महंतो अणुबंधो आसि। (कथा पृ. १४८) कुमाराला पहाताच तिच्या ठायी खूप प्रेम निर्माण झाले.
अर्धमागधी व्याकरण
१३) कधी इतर काही विभक्तीऐवजी सप्तमीचा उपयोग केलेला आढळतो. अ) द्वितीयेऐवजी ' तिलजंतम्मि वहंतो अहोनिसिं दुब्बलो जाओ। (सुर १६.१९०) अहर्निश तिल-यंत्र वाहून दुर्बळ झाला.
आ) तृतीयेऐवजी' : १) तिसु तेसु अलंकिया पुहवी। (वज्जा ८७) त्या तिघांकडून पृथ्वी अलंकृत होते. २) जइ विय गएसु अंगं पेल्लिज्जइ । (पउम २.१०९) आणि जरी हत्तींकडून अंग पीडिले जाई ३) पुप्फेसु होज्ज उम्मीसं बीएसु हरिसु वा । (दस ५.१.५७) फुले वा बी अथवा हरित यांशी मिश्र होईल.
-:
इ) पंचमी ऐवजी :- १) चंदेसु निम्मलयरा आइच्चेसु अहियं पयासमरा सिद्धा । (सामा पृ. १३) चंद्रापेक्षा अधिक निर्मल, सूर्यापेक्षा अधिक प्रकाश देणारे सिद्धं २) विणिमहंति भोगेसु । (दस २.११) भोगांतून निवृत्त होतात. ३) विरमह विसएसुं। (कथा पृ. १५५) विषयांतून निवृत्त व्हा. ४) पाणेसु पियतरी (वसु पृ. २३६) प्राणापेक्षा अधिक प्रिय.
ई) षष्ठीऐवजी : अज्ज सुहम्मे थेरे तिक्खुत्रो आयहिण पयाहिणं करेइ'। (नायासं पृ. २) माननीय वृद्ध आर्य सुहम्माला तीनदा प्रदक्षिणा करतो.
१
२
४१३ संबोधन विभक्तीचे उपयोग
१) हाक मारतांना : १) पुत्तय तुह साहसेण तुट्ठ म्हि। (महा पृ. १६३ ब) मुला तुझ्या साहसाने मी संतुष्ट झाले आहे. २) भयवइ कुलदेवए । (समरा पृ. २४९) भगवती कुलदेवते ।
२) कधी 'धी' या अव्ययाबरोबर संबोधनाचा उपयोग केला जातो. १) धी धी पुरोहियाहम। (महा पृ. ५८ ब) अधम पुरोहिता । धिक्कार ( तुझा ) । २) धि धि उज्जहकारिए। (धर्मों पृ. ८६) मालिन्य आणणाऱ्या स्त्रिये, धिक्कार ( तुझा) ।
द्वितीयातृतीययोः सप्तमी। हेम ३.१३५
अज्ज सुहम्मे थेरे इत्यत्र षष्ठ्यर्थे सप्तमी । अभयदेव नाया पोथी पृ. १० ब.