________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४२७
१२) समकालीन क्रिया वा सहचारी स्थिती दर्शविताना सति सप्तमीचा' उपयोग केला जातो.
१) संते पाइयकव्वे को सक्कद सक्कमं पढिडं। (वज्जा २९) प्राकृत काव्य असताना संस्कृत काव्याचा भ्यास कोण करू शकेल? २) थणियसद्द कुणमाणेसु सजलजलहरेसु मंद मंदं निवडंतीसु वारिधारासु नियनियगेहं अणुवच्चंतेसु पहियजणेसु माणससरं सरंतेसु रायहंसेसु सामी पडिनियत्तिऊण समागओ तत्थेव। (महा पृ. १४६ ब) जलपूर्ण मेघ गर्जना करीत असताना (पावसाच्या) पाण्याच्या दारा मंद मंद पडत असताना वाटसरू आपापल्या घरी (परत) चालले असताना, राजहंस मानस सरोवर आठवीत असतांना स्वामी मागे परतून त्याच ठिकाणी आला. (३०) तम्मि य गए भणियं जण्हुकुमारण।
(पाकमा. पृ. २०) आणि तो गेल्यावर जण्हुकुमाराने म्हटले ४) एवं च कए समाणे लोयवाओ वि परिहरिओ होइ। (समरा पृ. १०६) आणि असे केले असता लोकापवाद सुद्धा दूर केला असे होईल. ___अ) धातुसाधिताबरोबर कधी एवं, इत्थं, इह, तहा यांचा उपयोग केला
जातो.
१) तहा कए खुब्भइ सामंतवग्गो (महा पृ. ३२ अ) तसे केले असता सामंतवर्ग क्षुब्ध होईल. २) इय भणिए सो चिंतेउ आरद्धो। (महा १.८२) असे म्हटले असता त्याने विचार करण्यास सुरवात केली.
आ) धातुसाधिताबरोबर एव, मेत्त (मात्र) यांचा उपयोग असता तत्क्षणी, नाही-तोच' असा अर्थ होतो.
१) एवं च भणियमेत्ते गणहरवसहो कहेइ भूयत्थं। (पउम ४.६७) असे
___ सति सप्तमी : जेव्हा गौण घटना व क्रिया यांनी प्रधान घटनेच्या वा क्रियेच्या
कालाचा-समकालीन वा किंचित उत्तरकालीन-बोध होतो, तेव्हा सति सप्तमी वापरतात. १) समकालीन घटना असता, गौण घटनेतील क्रियापदांचे व का. धा. वि. आणि घटना भिन्न कालीन असतां, धातूचे क. भू. धा. वि. यांचा उपयोग करतात २) कर्तरि धातु विशेषण व कर्ता हे दोन्हीही सप्तमीत ठेवले जातात, कर्मणि धातु विशेषण असल्यास त्याचे कर्म व ते धातुसाधित यांची सप्तमी ३) या सप्तम्यन्त शब्दाबरोबर ‘अस' चे सप्तम्यन्त व का. धा. वि. कधी उक्त वा अनुक्त असते. सत्षष्ठीच्या रचनेत सप्तमीऐवजी षष्ठी वापरावयाची.