________________
४२६
अर्धमागधी व्याकरण
१) व्यापृत : गुरूजणणि जणयकजम्मि वावडत्रणं । (धर्मों पृ. ३) गुरू, आई, बाप यांच्या कार्याच्या बाबतीत व्यापृतत्त्व
२) आसक्त : १) आसत्तो जिणधम्मे (सुपास ५४१) जिनधर्मात आसक्त २) जे गिध्दे कामभोगेसु। (उत्त. ५.५) कामभोगात जे आसक्त ३) जे विसएसु पसत्ता। (पउम ३३.३६) विषयांत जे आसक्त.
३) अनुरक्त : जिणवयणे गाढमणुरत्तो। (सुर १.११३) जिनवचनाचे ठायी गाढ अनुरक्त.
४) कुशल : जाओ एसो कलासु कुसलो। (महा. पृ. ९० अ) हा कलामध्ये कुशल झाला.
५) निपुण : मीयाइसु निउणा। (सिरि ५९) गाणे, वगैरेमध्ये निपुण
६) विचक्षण : वियक्खणो मणिपरिक्खाए। (कुम्मा ७४) रत्न परीक्षेत विचक्षण
७) रत : १) धम्ममि रओ। (सुपास ५९०) धर्मात रत २) निरओ परोवयारे। (अगड१३) परोपपकरांत निरत
८) लुब्ध : णवरं गुणेसु लुद्धा। (धर्मो पृ. १०२) फक्त गुणांचे ठायी लुब्ध.
९) प्रमत्त : जिणधम्ममि पमत्ता । (सुपास ६२९) जिनधर्माबद्दल प्रमाद करणारी.
१०) उद्विग्न : उव्विग्गा सयलकज्जेसु। (सुर १०.३१) सर्व कार्यात उद्विग्न अ) पुढील विशेषणांनाही सप्तमीची अपेक्षा असते.
१) समो निंदापसंसासु। (उत्त १९.९०) निंदा-प्रशंसेचे बाबतीत सम. २) छेओ परचित्त परिण्णाणे। (महा पृ. २३ अ) दुसऱ्याचे चित्त जाणण्यांत हुशार ३) तवोकम्मंसि उज्जत्तो। (उत्र १९.८०) तपः कर्मात उद्युक्त ४) मंदो सद्धम्मकजम्मि। (सुपास ५०७) सद्धर्मकार्यात मंद ५) परंमुहो परकलत्ते। (समरा पृ. ४०६) परस्त्रीपासून पराङ्मुख ६) असंतुट्ठो परोवयारे। (समरा पृ. ४०६) परोपकार करण्यांत असंतुष्ट ७) अणुकूला सव्वकज्जेसु। (नाण १०.१५) सर्व कार्यात अनुकुल ८) संजमम्मि य जुत्राणं। (दस ३.१०) संयमात युक्त असणाऱ्यांचे ९) आयाण निक्खेवे संजओ। (उत्त१२.२) आदान-निक्षेपांच्या बाबतीत संयत