________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४२५
पृ. ११४) मानवी भोगाविषयी (भोगांत) मूढ होऊ नका.
११) प्रवृत्त होणे : भोगेसु को पयट्टेजा। (महा. पृ-. ७३७ ब) भोगांच्या बाबतीत कोण प्रवृत्त होईल?
१२) प्रयत्न करणे : १) जइयव्वं परोवयारे। (समरा पृ. ७३२) परोपकाराच्या बाबतीत प्रयत्न करावा. २) जत्तो गुणेसु कायव्वो। (समरा पृ. २१) गुणांचे (प्राप्तीच्या) बाबतीत यत्न करावा. ३) तुम्हेहिं चित्तसुध्दीए जइयव्वं। (कथा पृ. १०७) तुम्ही चित्तशुध्दीच्या बाबतीत प्रयत्न करावा.
१३) लोभ : जसंसि निम्मले लोहो (समरा पृ. ७) निर्मळ यशाचे बाबतीत लोभ.
१४) प्रभाव' : सुरासुरेसु वि पहवइ विही। (नल पृ. २५) सुर व असुर यावर सुद्धा दैवाचा प्रभाव आहे.
१५) प्रहार : १) को तुमं जो सुत्तेसु पहरसि। (नल प. ५०) झोपलेल्यावर प्रहार करणारा असा तू कोण? २) ते किवाणो कि न लज्जए इमेसु पसुपाएसु पहरंतो। (नल पृ. १२) या पशुप्राय (जनांवर) प्रहार करताना तुझ्या कृपाणाला लाज वाटत नाही काय?
अ) पुढील काही नामांनाही सप्तमीची अपेक्षा असते.
१) संसारे मे धिई नत्थि। (जिन पृ. ३८) संसारात माझी आस्था नाही. २) इमस्स विजए वि मज्झ संदेहो। (महा. पृ. ९३ ब) याच्या विजयाच्या बाबतीतही मला संदेह आहे. ३) सुहाभिमाणो तेसु। (बंभ पृ. ३६) त्यांच्या ठिकाणी सुखाभिमान ४) भत्ती जिणेसु मित्ती जिएसु। (सुपास. ५६६) जिनांवर भक्ति जीवाच्या ठायी मैत्री ५) को गुणेसु मच्छरो । (धर्मो पृ. १७८) गुणांच्या बाबतीत कसला मत्सर? ६) पावेसु समा भीरूत्तणं। (समरा. ७) पापांचे विषयी सहा भीरूत्व ७) पुव्वदुक्कडेसु अच्वंतं अणुभावो। (समरा पृ. २७४) पूर्व दुष्कृत्याबद्दल अत्यंत अनुताप ८) जइ पुत्त तुज्झ रज्जे नत्थि रूई। (कथा पृ. १२४) मुला, तुझी जर राज्याच्या ठिकाणी रूची नसेल.
११) खालील अर्थाच्या विशेषणांना सप्तमीची अपेक्षा असते.
१) पुष्कळदा षष्ठी असते.