________________
४२४
अर्धमागधी व्याकरण
ठिया अणसणे। बंभ पृ. ३४) उपवास करू लागले.
४) रागावणे' : (ज्यावर रागवायचे त्याची सप्तमी ) : १) अवरद्धे विन कुप्पइ। (समरा पृ. ४८) अपराध्यावर सुद्धा रागावत नाही. २) न तेसु कुज्झे । (सूय १.१४.९) त्यांच्यावर रागावू नये.
५) विश्वासाणे : (ज्यावर विश्वास त्याची सप्तमी ) : १) रमणीसु पत्तियसि। (महा. २०१ ब ) स्त्रियांवर विश्वास ठेवतोस २) महिलियासु उ वीसंभो नये कायव्वो। (धर्मो पृ. १४८) स्त्रियांवर विश्वास ठेवू नये २) कहं वा खणमेत्तं पि वज्झवत्थूसु विस्सासो । (महा. प. ६८ अ) बाह्य वस्तूंवर क्षणमात्र तरी कसा विश्वास ( ठेवावा ) बरे ?
६) (रंजणे) : मा रज्जह विसएसुं (कथा पृ. १०) विषयात रजू (आसक्त होऊ) नका.
७) प्रेम, अनुराग : ज्यावर प्रेम त्याची सप्तमी ) : १) सयणेसु सिणेहो (संपइ १.११६) स्वजनांवर स्नेह २ ) जाया एयस्स अम्हेसु पीई । (समरा पृ. २५२) त्याची आमच्यावर प्रीति झाली. ३) अत्थि से धम्मचरणम्मि अणुराओ । (समरा पृ. ३००) त्याचा धर्माचरणावर अनुराग आहे.
८) प्रमाद करणे : (ज्या बाबतीत प्रमाद त्याची सप्तमी ) १) जो धम्ममि पमायइ। सुर ८.१५० ) जो धर्माचे बाबतीत प्रमाद करतो. २ ) को पमायड़ जिणिंदधम्ममि सोक्खहेउम्मि । ( महा पृ. ६२ब) सौख्यहेतु अशा जिनेंद्राच्या धर्मांत कोण प्रमाद करतो ?
९) अपराध करणे : (ज्याचा अपराध, त्याची सप्तमी ) :
जो अणगारे... अवरज्झइ । ( वसु पृ. २२७ ) जो अनगाराचा अपराध करतो.
१०) मूढ होणे : १) मुज्झति हियाहिएसु । (समरा पृ. २७५) हित व अहित याबद्दल मूढ होतात. २) मा माणुस्सएस भोगेसु ... मुज्झह। (नायासं
१) पुष्कळदा षष्ठी असते.
२) पुष्कळदा षष्ठी असते. कधी 'सद्दह' धातु द्वितीया घेतो. : सद्दहामि तुम्ह वयणं (कथा पृ. १३८) सद्दहामि निग्गंयं पावयणं। (निरया पृ. ७१)